-
बिहार विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसतसा अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा तापू लागला आहे. सुशांतच्या आत्महत्येवरून राजदचे आमदार अरूण यादव यांनी सुशांत सिंह राजपूत हा राजपूत नसल्याचं विधान केलं आहे. या विधानानं राजकीय वर्तुळात टीकेचा सूर उमटला आहे. (सर्व छायाचित्र संग्रहित)
-
अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर सुशांतनं आत्महत्या केली नसल्याचा संशय व्यक्त करत चौकशी करण्याची मागणी पुढे आली होती. पोलिसांनी तपासही सुरू केला होता. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं.
-
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण सध्या बिहारच्या राजकारणात गाजत आहे. बिहार विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसा सुशांतला न्याय मिळवून देण्याचा मुद्दा राजकीय पक्षांकडून उपस्थित केला जात आहे. भाजपाकडून तसा प्रचार केला जात असल्याचं वृत्तही समोर आलं होतं.
-
असं असतानाच राजदचे आमदार अरूण यादव यांनी सुशांत राजपूत नसल्याचं विधान केलं आहे. त्यावरून विरोधकांनी यादव यांच्यावर टीका केली आहे.
-
“अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा राजपूत जातीचा नव्हता. जर तो राजपूत असता तर त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली नसती. कारम राजपूत महाराणा प्रताप यांच्या वंशज आहे.”
-
“तो जर राजपूत होता, तर त्यानं सामना करायला हवा होता. राजपूत स्वतः मरण्याआधी समोरच्याला संपवतात. सुशांतनं स्वतः गळफास घेऊन आत्महत्या करायला नको होती,” असं अरूण यादव यांनी म्हटलं.
-
अरूण यादव यांनी सुशांत सिंहबद्दल केलेल्या विधानानंतर बिहारमधील राजकीय नेत्यांनी त्यांच्या टीका केली आहे. यादव यांनी बिहारच्या जनतेची आणि त्याच्या चाहत्यांची माफी मागावी अशी मागणी भाजपा व जदयूनं केली
-
“सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युविषयी राजदच्या आमदारानं केलेल्या विधानापेक्षा जास्त विचित्र व लज्जास्पद काहीच असू शकत नाही. सदरील आमदारानं राज्यातील जनतेची आणि सुशांतच्या चाहत्यांची माफी मागायला हवी,” असं जदयूचे प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी म्हटलं आहे.
-
विधानावरून वादंग उठल्याचे लक्षात येताच अरुण यादव यांनी सावरासारव करण्याचा प्रयत्नही केला. “सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास करत आहे. आमचे नेते तेजस्वी यादव यांनीही सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. नालंदामध्ये उभारण्यात येणाऱ्या फिल्म सिटीला सुशांतचं नाव देण्याची मागणीही आम्ही केली आहे,” असं यादव म्हणाले.
-
अरुण यादव यांच्या विधानावर भूमिका मांडताना सुशांतचा चुलत भाऊ आणि भाजपाचे आमदार नीरज कुमार सिंह यांनी टीका केली. “राजद आमदारांची मानसिक स्थिती चांगली नाही, त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. अरुण यादव यांचं तिकीट कापलं जाणार आहे. त्यामुळेच त्यांची मानसिक स्थिती चांगली नाही. याच कारणामुळे ते काहीही बोलत आहेत. जनता त्यांना त्यांच्या वक्तव्यांचा अर्थ समजावून सांगेल,” असं नीरज कुमार सिंह म्हणाले.

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल