चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गैरवर्तणूक केल्याचे आरोप केल्यामुळे सध्या अभिनेत्री पायल घोष चांगलीच चर्चेत आली आहे. पायलने ट्विटरवर पोस्ट शेअर करत अनुराग कश्यपवर आरोप केले आहेत. सोबतच एका मुलाखतीचा व्हिडीओदेखील तिने शेअर केला आहे. तिच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर सध्या पायल घोष या नावाची चांगलीच चर्चा रंगली आहे. ( सौजन्य : पायल घोष इन्स्टाग्राम) पायल घोष ही लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पायलने २०१७ मध्ये पटेल की पंजाबी शादी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पटेल की पंजाबी शादी या चित्रपटात तिला अभिनेता परेश रावल, दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. पायल मूळ कोलकात्ता येथील आहे. तिने सेंट पॉल्स मिशन स्कूल या शाळेतून शिक्षण घेतल्याचं म्हटलं जातं. तर कोलकात्तामधील स्कॉटिश चर्च कॉलेज येथून तिने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आहे. पायल सध्या मुंबईमध्ये स्थायिक असून करिअर घडविण्याचा प्रयत्न करत आहे. वयाच्या १७ व्या वर्षी तिने बीबीसीची टेलीफिल्म Sharpe's Peril मध्ये काम केल्याचं म्हटलं जातं. पायलने एका कॅनेडियन चित्रपटातदेखील काम केलं होतं. या चित्रपटात तिने एका शालेय मुलीची भूमिका साकारली होती. ही शालेय मुलगी शेजारी राहणाऱ्या घरातील एका नोकराच्या प्रेमात पडते असं या चित्रपटात दाखविण्यात आलं आहे. आपल्या अभिनयामुळे आणि बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत राहणाऱ्या पायलने कलाविश्वात पदार्पण करु नये असं तिच्या आई-वडिलांना वाटत होतं. मात्र पायलने आई-वडिलांचा विरोध पत्करुन या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पालने कॉलेजला सुट्टी असताना कोलकात्तामधून पळ काढला आणि थेट मुंबई गाठली. मुंबईत आल्यावर पायलने किशोर अॅक्टींग अॅकॅडमी येथे अॅडमिशन घेतली. येथे तिची ओळख चंद्रा शेखर येलेती यांच्यासोबत झाली. विशेष म्हणजे त्यांच्यामुळेच पायलला पहिला तेलुगू चित्रपट मिळाला. Prayanam नंतर पायलने Oosaravelli आणि Mr. Rascal यांसारख्या अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं. करिअरचा आलेख टप्प्याटप्प्याने सर करणारी पायल सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असून ती अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत असते. बऱ्याच वेळा हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करणारी पायल यावेळी मात्र अनुराग कश्यपवर आरोप केल्यामुळे चर्चेत आली आहे.

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच