-
आपल्या नृत्यकलेच्या जोरावर अनेकांना भूरळ पाडणाऱ्या सपना चौधरीनं मंगळवारी एका गोंडस बाळाला जन्म दिला. तिचा पती वीर साहू यानं सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली. (फोटो -इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, सपना चौधरीनं आपल्या लग्नाबाबतही अद्याप गुप्तता बाळगली होती. वीर साहू याच्यासोबत ती रिलेशनशीपमध्ये असल्याची तसंच तिनं लग्न केल्याचं वृत्त समोर आलं होतं. परंतु अधिकृतरित्या याबाबत कोणतंही वक्तव्य करण्यात आलं नव्हतं.
-
दरम्यान, आता तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला असून तिच्या पतीनं याबाबत माहिती दिली. त्यानंतर तिच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
हिसारमध्ये राहणाऱ्या सपना चौधरी जानेवारी महिन्यात विवाहबद्ध झाली होती. वीर साहू याच्या कुटुंबात एका व्यक्तीचं निधन झाल्यामुळे त्यांच्या विवाहाबद्दल माहिती देण्यात आली नव्हती. आता लहान बाळाच्या आगमनानंतर दोघंही खुश आहेत.
-
सोशल मीडियावर सपनाचा पती वीर याला चाहत्यांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं. तर काही जणांनी वीर आणि सपना यांना ट्रोलही केलं. वीर यानं फेसबुक लाईव्हद्वारे आपण आई-वडिल झाल्याची माहिती दिली. यादरम्यान, त्यांनी ट्रोलर्सनाही योग्य उत्तर दिलं.
-
आपल्या खासगी आयुष्यात कोणीही हस्तक्षेप करून नये. तसंच पब्लिसिटीसाठी आपण विवाह केला हे गोष्ट सांगण्याची काय गरज? असंही तो म्हणाला.
-
वीरदेखील एक गायक आणि अभिनेता आहे. तसंच सपना चौधरीच्या प्रत्येक कामाला तो पाठिंबाही देत असतो.
-
सपना आपल्या स्टेज शो साठी प्रसिद्ध आहे. तिचं आख्या का यो काजल हे गाणं फार गाजलं होतं. याव्यतिरिक्त अशी अनेक गाणी आहेत जी फार प्रसिद्ध झाली आहेत.
-
तर दुसरीकडे वीर साहू हरयाणातील प्रसिद्ध गायक, लेखक आणि अभिनेता आहे. त्याचेही लाखो चाहते आहेत.
-
वीरनं थड्डी बड्डी चित्रपटातून पदार्पण केलं होतं.

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य