कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय रिअॅलिटी शोचा बारावा सिझन सध्या सुरू आहे. याआधी अकरा सिझनमध्ये कोट्यवधी रुपये जिंकलेले स्पर्धक आता काय करत आहेत ते जाणून घेऊयात.. अकराव्या सिझनमध्ये चार जणांनी कोट्यवधी रुपये जिंकले होते. त्यापैकी २५ वर्षांचा सनोज राज सध्या युपीएससी परीक्षेची तयार करत आहे. तर शाळेत माध्यान्ह भोजन बनवणाऱ्या बबिता ताडे या अजूनही शाळेतील मुलांसाठी काम करत आहेत. शाळेतील मुलांसाठी त्यांनी जिंकलेल्या रकमेचा वापर केला आहे. गौतम कुमार जा यांनी पाटणामध्ये स्वत:चं घर खरेदी केलं आणि ते रेल्वेतील नोकरी करत आहेत. तर अजीत कुमार हे कारागृह अधीक्षकाची नोकरी करत आहेत. केबीसीमध्ये भाग घेतला तेव्हा ते परीक्षेसाठी तयारी करत होते. सिझन १०- बिनिता जैन आसामच्या बिनिता जैन या एक कोटी रुपये जिंकल्या होत्या. मिळालेल्या रकमेचा वापर त्यांनी मुलांच्या शिक्षण व भविष्यासाठी केला. त्यांनी नुकताच मुलासाठी दातांचा दवाखाना सुरु केला आहे. सिझन ९- अनामिका मजुमदार आठव्या सिझननंतर तीन वर्षांनी केबीसीचा नववा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. जमशेदपूरच्या अनामिका मजुमदार विजेत्या ठरल्या होत्या. एका स्वयंसेवी संस्थेत त्यांनी जिंकलेली रक्कम गुंतवली आहे. सिझन ८- अचिन आणि सार्थक नरुला अचिन आणि सार्थक या भावंडांनी सात कोटींची रक्कम जिंकली होती. आईच्या कॅन्सरवरील उपचारासाठी त्यांनी रकमेचा वापर केला आणि सध्या ते स्वत:चा व्यवसाय करत आहेत. सिझन ७- ताज मोहम्मद रंगरेज शिक्षक ताज मोहम्मद रंगरेज यांनी एक कोटी रुपये जिंकलं होतं. मिळालेल्या रकमेतून त्यांनी मुलीच्या डोळ्याचा ऑपरेशन, कुटुंबासाठी एक घर विकत घेतलं आणि दोन अनाथ मुलींचं लग्नही करून दिलं. सिझन ६- सुनमीत कौर सॉव्हने पाच कोटी रुपये जिंकणाऱ्या सुनमीत या शोमधील पहिल्या महिला ठरल्या होत्या. फॅशन डिझायनरचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सुनमीतने स्वत:चा कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. सिझन ५- सुशील कुमार सुशील कुमार यांनी पाच कोटी रुपये जिंकले होते. सध्या ते शिक्षक म्हणून काम करत आहेत. सिझन २- ब्रजेश दुबे ब्रजेश हे इलेक्ट्रिकल इंजिनीअर असून त्यांनी शोमध्ये एक कोटी रुपये जिंकलं होतं. सध्या ते लाइमलाइटपासून दूर निवांत आपलं आयुष्य जगत आहेत. सिझन १- हर्षवर्धन नवाथे पहिल्या सिझनचे विजेते हर्षवर्धन नवाथे हे जणू सेलिब्रिटीच झाले होते. जिंकलेल्या रकमेतून त्यांनी परदेशात शिक्षण घेतलं. सध्या ते मुंबईत असून त्यांना दोन मुलंसुद्धा आहेत.

VIDEO: विराट कधीच विसरत नाही! विजयानंतर राहुलला ‘हे माझं ग्राऊंड’ सेलिब्रेशन करत चिडवलं; सर्वांसमोर उडवली खिल्ली