आजही मॉडेलिंग क्षेत्रातील प्रतिष्ठित आणि नावाजलेलं नाव म्हणजे मिलिंद सोमण. वयाची ५० ओलांडलेल्या या अभिनेत्याचा आजही प्रचंड मोठा चाहता वर्ग असल्याचं दिसून येतं. ( सौजन्य : जनसत्ता) फिटनेसच्या बाबतीत सजग असणारा मिलिंद ‘फिटनेस फ्रिक’, ‘आयर्न मॅन’ अशा नावांनी ओळखला जातो. मिलिंदने आतापर्यंत अनेक नामांकित, नावाजलेल्या ब्रॅण्डसाठी फोटोशूट, मॉडेलिंग केलं आहे. कलाविश्वात अमाप यश आणि प्रसिद्धी मिळवणाऱ्या मिलिंदचा हा प्रवास सोपा नव्हता. कलाविश्वात येण्यापूर्वी त्याने हॉटेलमध्ये काम केल्याचं सांगण्यात येत. एकेकाळी कलाविश्वाशी साधी तोंड ओळखही नसणारा मिलिंद मुंबईतील एका हॉटेलमध्ये काम करायचा. हॉटेलमध्ये काम करत असताना एक दिवस अचानक काही जण मिलिंदला भेटण्यासाठी आले आणि तुझे काही फोटो हवे असल्याचं सांगितलं. या लोकांनी मिलिंदचे काही फोटो काढले. मिलिंदच्या करिअरमधील हे त्याचं पहिलं फोटोशूट होतं. त्याकाळी म्हणजे १९८९ मध्ये मिलिंदला या फोटोशूटसाठी तब्बल ५० हजार रुपये मिळाल्याचं सांगण्यात येतं. अनेक वर्ष हॉटेलमध्ये काम केल्यानंतरही इतके पैसे मिळणं शक्य नव्हतं. मात्र, मॉडेलिंग क्षेत्रात ते सहज शक्य होतं. त्यामुळे त्याने मॉडेलिंग करण्याचा पर्याय निवडला. बघता बघता मिलिंद मॉडेलिंग क्षेत्रातील सुपरस्टार झाला. मॉडेलिंग क्षेत्रात नशीब आजमावल्यानंतर मिलिंदने कलाविश्वात पदार्पण केलं. अनेक म्युझिक अल्बम आणि चित्रपटही त्याने केले. आलीशा चिनॉयसोबत मेड इन इंडिया या गाण्यात मिलिंद झळकला होता. विशेष म्हणजे हे गाणं त्याकाळी तुफान गाजलं. मिलिंद अनेकदा त्याच्या फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. यात त्याने केलेलं न्यूड फोटोशूट हे सर्वात जास्त चर्चेत राहिलं. -
२२ वर्षीय विद्यार्थिनीने १८ कोटींमध्ये अभिनेत्याला विकलं कौमार्य; कारण सांगत म्हणाली, “अनेक मुली…”