-
‘द किड्स् आर ऑल राइट’ या सुपरहिट चित्रपटामुळे नावारुपास आलेल्या प्रसिद्ध अभिनेता एडी हेसल याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तो ३० वर्षांचा होता. ही धक्कादायक घटना टेक्सास येथे घडली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तो प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. त्यावेळी दोन अज्ञात इसमांनी गोळ्या घालून त्याला ठार केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
डेडलाईनने दिलेल्या वृत्तानुसार एडी नेहमीप्रमाणे प्रेयसीला भेटण्यासाठी शनिवारी रात्री तिच्या घरी गेला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तो घराच्या दरवाज्याबाहेर उभा होता. तेवढ्यात दोन अज्ञात व्यक्ती मोटारसायकल बसून त्याच्याजवळ आले अन् त्यांनी एडीच्या पोटावर गोळ्या झाडल्या. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
प्रेयसी दरवाज्याबाहेर आली तेव्हा तो विव्हळत पडला होता. त्यानंतर त्याला त्वरीत रुग्णालयात नेण्यात आले. परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. एडीच्या मृत्यूमुळे त्याच्या प्रेयसीला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
एडी हेसल हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
२००४ साली बर्थ ऑफ इंडस्ट्री या चित्रपटातून त्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर २०१२, जॉब्स, हाऊस ऑफ डस्ट, बॉर्न टू रेस फास्ट ट्रॅक यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
२०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘द किड्स् आर ऑल राइट’ या चित्रपटातून तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला होता. एडीच्या मृत्यूमुळे हॉलिवूड मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Holi 2025 Wishes : होळीच्या दिवशी ‘हे’ मेसेजेस पाठवून द्या खास शुभेच्छा; मित्र-मैत्रिणींपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच होतील खुश