सध्या ओटीटीचा जमाना असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे अनेक लोकप्रिय कलाकार आता चित्रपटांऐवजी वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यात अभिनेता स्वप्नील जोशी यानेदेखील वेब विश्वात पदार्पण केलं आहे. काही काळापूर्वी एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झालेली 'समांतर' ही वेब सीरिज साऱ्यांच्याच लक्षात असेल. अभिनेता स्वप्नील जोशी या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकला होता. 'समांतर' या सीरिजला मिळालेल्या तुफान यशानंतर या सीरिजचा पुढचा सिझन म्हणजेच 'समांतर 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'समांतर 2' मध्ये स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित मुख्य भूमिकेत झळकणार असून त्या दोघांचे बोल्ड सीन या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहेत. सध्या 'समांतर 2' चं चित्रीकरण सुरु असून या सेटवरचे काही फोटो 'लोकसत्ता ऑनलाइन'च्या हाती लागले आहेत. स्वप्नील आणि तेजस्विनी यांच्यातील बोल्ड फोटोशूट खरंतर तर स्वप्नील चॉकलेट बॉय म्हणून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होता. मात्र, या नव्या भूमिकेच्या माध्यमातून तो चॉकलेट बॉय या टॅगला छेद देण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. 'समांतर'च्या पहिल्या सिझनमध्ये बोल्ड सीनमुळे चर्चेत आलेली तेजस्विनी पुन्हा एकदा 'समांतर 2' मध्ये बोल्ड अंदाजात दिसून येणार आहे. दरम्यान, सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर आधारित 'समांतर' या सीरिजचा पहिला सिझन करण्यात आला होता. अभिनेत्री तेजस्विनी पंडित अनेकदा सोशल मीडियावर तिचे बोल्ड, बिंधास्त फोटो शेअर करत असते. -
तेजस्विनीने अलिकडेच केलेलं खास फोटोशूट

Holi 2025 Wishes : होळीच्या दिवशी ‘हे’ मेसेजेस पाठवून द्या खास शुभेच्छा; मित्र-मैत्रिणींपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच होतील खुश