अलिकडेच अॅमेझॉन प्राइमवर मिर्झापूर २ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. विशेष म्हणजे ही सीरिज प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर तिचीच चर्चा रंगली आहे. (सौजन्य : अली फजल इन्स्टाग्राम पेज) या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदु शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहे. ‘मिर्झापूर’मुळे कालीन भैय्या, गुड्डू आणि मुन्ना या भूमिका प्रसिद्ध झाल्या. या सीरिजमधील भूमिकांच्या तोंडी असणारे संवाद आणि एकंदरीतच या सीरिजबद्दलच्या अनेक गोष्टी सध्या चर्चेत आहेत. त्यातच सध्या या सीरिजमधील कलाकारांविषयी अनेक चर्चा रंगत असल्याचं दिसून येत आहे. त्यातच चर्चा होतीये ती म्हणजे अभिनेता अली फजलची. मिर्झापूर आणि मिर्झापूर २ मध्ये अभिनेता अली फजलने गुड्डू भैय्या ही भूमिका साकारली असून आज ही भूमिका आणि अली घराघरात पोहोचला आहे. सध्या कालीन भैय्यासोबतच गुड्डू भैय्या ही भूमिकादेखील चर्चेत आहे. मात्र, गुड्डू भैय्या या भूमिकेसाठी अली फजलऐवजी अन्य एका दुसऱ्या अभिनेत्याची निवड करण्यात आली होती असं सांगण्यात येतं. मिर्झापूर या सीरिजमध्ये अली फजल याला गुड्डूऐवजी दुसरी भूमिका देण्यात आली होती. मात्र, ती भूमिका पसंत न पडल्यामुळे अलीने मिर्झापूर सीरिज करण्यास नकार दिला होता. 'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत अलीने त्याला गुड्डू भैय्या ही भूमिका कशी मिळाली ते सांगितलं. "मिर्झापूर या सीरिजमधील गुड्डू ही भूमिकाच मल खूप आवडली होती. मात्र, सुरुवातीला मला अन्य दुसरी भूमिका करण्यास दिली होती. मला वाटतंय कदाचित ती मुन्नाची भूमिका असावी, ज्यात सध्या दिव्येंदू झळकला आहे. तर जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला गुड्डूची भूमिका जास्त आवडली आणि मला खात्री होती ही भूमिका मी उत्तमरित्या साकारु शकतो", असं अली म्हणाला. पुढे तो म्हणतो, "ज्या भूमिका मला मनापासून कराव्याशा वाटतात त्याच मी स्वीकारतो. त्यामुळे मला गुड्डूची भूमिका आवडली होती. परंतु, हे टीमवर्क होतं त्यामुळे मी सांगेन ती भूमिका मला लगेच मिळेल असं नाही. त्यामुळे माझ्याकडे तारखा नाहीत असं कारण देत मी ही सीरिज सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मला टीमकडून फोन आला पुन्हा एकदा प्रयत्न करा असं सांगण्यात आलं". अली फजलने साकारलेली गुड्डू ही भूमिका आज विशेष लोकप्रिय झाली आहे. अली सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून त्याने ही सीरिज प्रदर्शित होण्यापूर्वीच सीरिजविषयी अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. मिर्झापूरसोबतच अली सध्या त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहे. अली लवकरच अभिनेत्री रिचा चढ्ढासोबत लग्न करणार आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्याच्या लग्नाची जोरदार चर्चा होतना दिसत आहे.
२२ वर्षीय विद्यार्थिनीने १८ कोटींमध्ये अभिनेत्याला विकलं कौमार्य; कारण सांगत म्हणाली, “अनेक मुली…”