असे अनेक मराठी कलाकार आहेत जे केवळ अभिनयातच दमदार नाहीत तर शिक्षणातही आहेत. काहींनी दुसऱ्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेतल्यानंतर अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं तर काही कलाकार अभिनयातील करिअर करत असतानाच उच्च शिक्षण घेत आहेत. जाणून घेऊयात, मराठीतीली उच्चशिक्षित कलाकारांबद्दल.. निलेश साबळे- 'हसताय ना.. हसायलाच पाहिजे' असं आपुलकीने विचारणारा डॉ. निलेश साबळे हा आयुर्वेदाचार्य आहे. त्याने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. गिरीश ओक- 'अग्गंबाई सासूबाई'मधील अभिजीत म्हणजेच अभिनेते गिरीश ओक हेसुद्धा आयुर्वेदीक डॉक्टर आहेत. प्राजक्ता गायकवाड- 'स्वराज्यरक्षक संभाजी' आणि 'आई माझी काळूबाई' या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारणारी प्राजक्ता इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतेय. सुबोध भावे- मराठीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे यांने पुणे विद्यापीठातून एमएची पदवी पूर्ण केली आहे. सागर कारंडे- 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावरून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा सागर कारंडे हा कम्प्युटर इंजीनिअर आहे. इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००२ मध्ये सागरने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. शशांक केतकर- शशांकने ऑस्ट्रेलियातील सिडनी येथून इंजीनिअरिंग मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलंय. भारतात परतल्यानंतर त्याने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. पुष्कर जोग- 'बिग बॉस मराठी'मुळे चर्चेत आलेला अभिनेता पुष्कर जोग याने मुंबई विद्यापीठातून डेन्टिस्ट्रीची पदवी प्राप्त केली आहे.

Holi 2025 Wishes : होळीच्या दिवशी ‘हे’ मेसेजेस पाठवून द्या खास शुभेच्छा; मित्र-मैत्रिणींपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच होतील खुश