कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी व अभिनेत्री कश्मीरा शाहने नुकतंच बोल्ड फोटोशूट केलं. या फोटोशूटचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आणि त्यावर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पडू लागला. कश्मीराचा पती कृष्णालाही राहावलं नाही. त्यानेसुद्धा तिचा फोटो स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत, कश्मीरा मला तुझ्यावर अभिमान आहे, असं कॅप्शनमध्ये लिहिलं. जेव्हा तुमच्या घरी बिर्याणी असेल तर तुम्हाला बाहेरची दाल मखनी का हवी असेल?, असं कॅप्शन त्याने कश्मीराच्या फोटोला दिलं होतं. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत कश्मीराने सांगितलं होतं की कृष्णाला तिच्या बोल्ड फोटोशूटवर आक्षेप नसतो. “माझ्या हॉट आणि बोल्ड अंदाजावरच कृष्णा भाळला होता आणि पती-पत्नीच्या नात्यात शारीरिक आकर्षण हे खूप महत्त्वाचं असतं. मी त्याच्या विनोदबुद्धीकडे आकर्षित झाले होते," असं तिने सांगितलं होतं. सोशल मीडियावर बोल्ड फोटो पोस्ट करण्यावर किंवा बोल्ड फोटोशूट करण्यावर कृष्णाचा कधीच आक्षेप नसतो, असंही तिने स्पष्ट केलं. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पप्पू पास हो गया’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कश्मीरा व कृष्णा एकमेकांच्या प्रेमात पडले. २०१३ मध्ये लास वेगासमध्ये दोघांनी गुपचुप लग्न केलं. कृष्णा व कश्मीराला दोन मुलं आहेत. (सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, कश्मीरा शाह)

Holi 2025 Wishes : होळीच्या दिवशी ‘हे’ मेसेजेस पाठवून द्या खास शुभेच्छा; मित्र-मैत्रिणींपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच होतील खुश