-
छोट्या मिया या लोकप्रिय कॉमेडी शोमधून घराघरात पोहोचलेली गंगूबाई उर्फ सलोनी दैनी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सलोनीने आपल्या नव्या लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लहान असताना तिच्या जाड शरीरामुळे तिला चिडवलं जायचं. अनेकदा कॉमेडी शोमध्ये देखील तिच्या शरीरावरुन विनोद केले जायचे. या पार्श्वभूमीवर तिचा स्लीम ट्रिम लूक पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
नुकतेच टेली चक्करला दिलेल्या मुलाखतीत सलोनीने आपला संघर्षाचा काळ कसा होता? याबाबत सांगितलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"लोक मला माझ्या शरीरावरुन खुप चिडवायचे. मला हत्तीचं पिल्लू म्हणायचे. माझ्या वयाच्या इतर मुलींच्या तुलनेत मी थोडी जाड होते. शिवाय माझी उंची देखील खूप कमी होती." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"कॉमेडी शोमध्ये माझ्या शरीरावर विनोद केले जायचे. त्यावेळी कॅमेरासमोर मी हसायचे पण आतून मी रडायचे." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"वजनदार शरीराच्या माझ्या करिअरवर फारसा प्रभाव पडला नाही. कारण काही बोलण्यापूर्वीच माझं ओबडधोबड शरीर पाहून प्रेक्षक हसायचे." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"पण एक दिवस मी या परिस्थितीतून बाहेर येण्याचा निश्चय केला. योग्य आहार व भरपूर व्यायाम करुन शरीरातीत अतिरिक्त वजन कमी केले. गेल्या वर्षभरात मी २२ किलो वजन कमी केलं आहे." असा अनुभव सलोनीने सांगितला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सलोनी दैनी ने २००८ साली 'छोटे मिया' या लहान मुलांच्या कॉमेडी शोमधून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. या शोमध्ये ती गंगूबाई हे पात्र साकारायची. तिची ही व्यक्तिरेका त्यावेळी तुफान गाजली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर तिने 'रावी', 'नमुने', 'बडे भैया की दुल्हनिया', 'तेडी मेढी फॅमेली' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती