-
धडाकेबाज फलंदाज लोकेश राहुल हा कायम तरूणींच्या चर्चैचा विषय असतो.
-
यंदाच्या IPLमध्ये राहुलने दमदार खेळ करत सर्वाधिक धावांसह ऑरेंज कॅपचा बहुमान पटकावला आहे.
-
पण चेन्नई विरूद्धच्या 'करो वा मरो'च्या सामन्यात मात्र पराभूत झाल्याने राहुलच्या संघाला गाशा गुंडाळावा लागला.
-
स्पर्धेतून बाहेर गेल्यावर आणखी एक कारणामुळे काल राहुल चर्चेत आला.
-
राहुलने एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत फोटो शेअर करत तिला वेडा बच्चा असंही म्हटलं.
-
ही अभिनेत्री म्हणजे राहुलची अगदी जवळची मैत्रिण अथिया शेट्टी. राहुल आणि अथिया यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे.
-
अनेक ठिकाणी राहुल आणि अथिया अनपेक्षितपणे एकत्र दिसल्याने या चर्चांना कायमच दुजोरा मिळाला आहे.
-
तशातच ५ नोव्हेंबरला राहुलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून रात्री अथियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
-
या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने अथियाला प्रेमाने 'वेडा बच्चा' (Mad Child) असं म्हणत शुभेच्छा दिल्या. अथियानेदेखील तो फोटो आपल्या इन्स्टास्टोरीवर ठेवला होता.
-
राहुलने आपल्या इन्स्टा स्टोरीवरदेखील अथियाचा एक केक खातानाचा फोटो पोस्ट केला होता. इतका केक पाहून अथिया नक्कीच आनंदी होईल असं त्याने त्या फोटोखाली लिहिलं होतं. (सर्व फोटो- राहुल आणि अथिया शेट्टी इन्स्टाग्राम)

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी