-
‘स्टाइल’ सिनेमातून सर्वांच्या ओळखीचा झालेला चेहरा म्हणजे अभिनेता साहिल खान. एक सुपर हिट सिनेमा केल्यानंतर साहिल अचानक सिनेसृष्टीतून गायब झाला. (सर्व फोटो सौजन्य – साहिल खान इन्स्टाग्राम)
-
२००१ साली आलेल्या ‘स्टाइल’ सिनेमासाठी साहिल खान ओळखला जातो. पाच नोव्हेंबर १९७६ रोजी कोलकात्तामध्ये त्याचा जन्म झाला. 'नाचेंगे सारी रात' या म्युझिक व्हिडीओमधून त्याने त्याचे करिअर सुरु झाले. 'ओह लैला' या म्युझिक व्हिडीओमध्ये एन. चंद्रा यांनी त्याचा परफॉर्मन्स नोटीस केला. त्यावेळी त्यांचे उत्तम शरीरयष्टी असलेल्या या नायकाकडे लक्ष गेले.
-
एन. चंद्रा यांनी साहिल खानला २००१ साली ‘स्टाइल’ सिनेमात संधी दिली. शर्मन जोशीसोबत त्याने बॉलिवूडमध्ये या कॉमेडी सिनेमातून डेब्यु केला. २०१० साली साहिल खान 'रामा: द सेवियर' चित्रपटात झळकला. तनुश्री दत्ता, द ग्रेट खली सुद्धा या चित्रपटात होते.
-
त्यानंतर साहिल खान अचानक स्पॉटलाइटमधून गायब झाला. बॉलिवूड सोडल्यानंतर त्याने फिटनेसला प्राधान्य देत व्यायामाला पूर्णवेळ पेशा म्हणून स्वीकारले. गोव्यात साहिल खानची 'मसलस अँड बीच' नावाची जिमची म्हणजेच व्यायामशाळेची साखळी आहे.
-
अभिनय क्षेत्रात फारस यश मिळवू न शकलेला साहिल खान अनेक वादांमध्येही सापडला. आयशा श्रॉफ यांनी त्याच्याविरोधात तक्रार नोंदवल्यानंतर साहिल खान फरारही झाला होता. या वादाची सुरुवात २०१४ मध्ये झाली. जेव्हा जॅकी श्रॉफच्या पत्नीने आयशा श्रॉफ यांनी त्याच्याविरोधात रीतसर पोलीस तक्रार नोंदवली. आयशा श्रॉफ यांच्याबरोबर त्याची व्यावसायिक भागिदारी होती.
-
पाच कोटी रुपयांना फसवणूक केली म्हणून आयशा श्रॉफ यांनी साहिल खान विरोधात तक्रार नोंदवली होती. व्यवसायासाठी म्हणून साहिलने आपल्याकडून हे पैसे घेतले होते, असा आरोप त्यांनी केला होता.
-
साहिल खान आणि आयशा श्रॉफ यांनी २००९ साली सायबर सिक्युरिटी कंपनी आणि प्रोडक्शन हाऊसची स्थापना केली होती. ते एक चित्रपटही बनवणार होते. पण तो प्रकल्प गुंडाळला गेला आणि प्रोडक्शन हाऊस बंद झाले.
-
साहिल खानने नंतर आयशा श्रॉफ यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा दावा केला, त्यावेळी आयशा यांना साहिलविरोधात आणखी एक एफआयआर नोंदवला. पोलीस जेव्हा त्याला अटक करण्यासाठी पोहोचले तेव्हा तो फरार झाला होता.
-
साहिल खानचा प्रेमसंबंधांचा दावा फेटाळून लावताना आयशा यांनी साहिल समलैंगिक असल्याचा आरोप केला. त्यानंतर साहिलने आपलाा दावा सिद्ध करण्यासाठी आयशा यांच्यासोबतचे काही प्रणयाचे फोटो दाखवण्यासाठी इन कॅमेरा सुनावणी घेण्याची मागणी केली होती.
-
साहिल खानचे आताचे सोशल मीडियावरील फोटो पाहिल्यानंतर तो ऐशोआरामात आयुष्य जगत असल्याचे स्पष्ट होते. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या कित्येक फोटोंमध्ये ललना त्याच्यासोबत असतात.

४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार