अभिनेत्री हेमांगी कवीसाठी यंदाची दिवाळी अधिकच खास होती. कारण ही दिवाळी तिने मुंबईतील तिच्या हक्काच्या घरात साजरी केली आहे. 'नव्या नवलाईने गृहप्रवेश हो झाला', असं म्हणत हेमांगीने तिच्या नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. मुंबईसारख्या ठिकाणी घर घेणं आमच्यासारख्यांना अशक्य आहे हे खूप आधीच आमच्या लक्षात आलं होतं. म्हणून मग 'म्हाडा' मध्ये सलग आठ वर्ष प्रयत्न केल्यावर २०१६ मध्ये मला लॉटरी लागली आणि बोरीवलीत आम्हाला घर लाभलं, असं तिने लिहिलं. त्याआधी हेमांगी भाडेतत्त्वावर कधी दादर तर कधी दहिसरमध्ये राहायची. प्रत्यक्षात घराचा ताबा मिळायला नोव्हेंबर २०१९ उजाडलं. सर्व तांत्रिक सोपस्कार आटपून आणि हवी तशी सजावट करून घेऊन फेब्रुवारीमध्ये हेमांगीने घरात 'गृहप्रवेश' केला. 'त्यावेळी आम्ही दोघंही मालिकांमध्ये प्रचंड व्यस्त होतो आणि नंतर मार्च मध्ये करोनामुळे आम्ही गावी निघून गेलो. चार महिने साताऱ्याला राहून आम्ही जूनमध्ये आमच्या या नवीन घरात परतलो. पण मग जून पासूनच पुन्हा कामं सुरू झाली आणि आम्ही वेगवेगळ्या शहरात शूटिंगसाठी निघून गेलो. त्यामुळे खूप काळ आम्हाला आमच्या या नवीन घरात राहायलाच मिळालं नाही किंवा कुठलेच सण नीटसे साजरे करता आलेच नाहीत,' अशी खंत तिने व्यक्त केली. यावेळी काहीही झालं, कितीही व्यग्र वेळापत्रक असलं तरी सुट्टी घेऊन या नवीन, हक्काच्या घरातच दिवाळी साजरी करण्याचा निर्धार हेमांगीने केला. त्या अनुषंगाने तिने पती संदीप धुमाळ यांच्यासोबत नवीन घरात पाडवा साजरा केला. हेमांगीचे पती संदीप धुमाळ हे सिनेमॅटोग्राफर आहेत. त्यांच्या आणि हेमांगीच्या कल्पनेतून हे घर साकारलं आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, हेमांगी कवी)

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे