-
Anil Kapoor House: बॉलिवूडचा एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूर हा त्याच्या फिटनेस आणि अभिनयामुळे सदैव चर्चेत असतो.
-
सुमारे ४० वर्षांपेक्षाही अधिक काळ अनिल कपूर आपल्या अभियनाने केवळ भारतीयच नव्हे तर जगभरातील चाहत्यांचे मनोरंजन करतो आहे.
-
अनिल कपूरने आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये अभिनय साकारला आहे.
-
बॉलिवूडच्या या सुपरहिट सिनेस्टारचा मुंबईमधला बंगलादेखील तितकाच सुपरहिट आहे.
-
अनिल कपूरचा मुंबईत असलेला बंगला अतिशय आलिशान आणि सुखसोयींनी युक्त असा आहे. पाहूया त्याच्या बंगल्याचे काही खास फोटो
-
अनिल कपूरचा मुंबईतील बंगला उच्चभ्रू वस्तीसाठी लोकप्रिय असलेल्या जुहू येथे आहे.
-
या 'सी-फेसिंग' बंगल्याची किंमत ३० कोटींहूनही अधिक आहे.
-
अनिल कपूरच्या बंगल्यामध्ये सोयी-सुविधांसाठी आवश्यक सर्व गोष्टी आहेत.
-
बंगल्यातच एक मिनी थिएटर बनवण्यात आलं आहे. तिथे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून चित्रपटाचा आनंद लुटतात.
-
घरात स्विमींग पूल आणि जिमदेखील आहे. अनिल कपूर कायम जिममधील फोटो शेअर करताना दिसतो.
-
बंगल्याचे इंटेरियर डिझायनींग अनिल कपूरची पत्नी सुनिता हिने केले आहे.
-
सुनीता स्वत: एक नामांकित इंटेरियर डिझायनर आहे. तिने आपलं घर अतिशय कलात्मक पद्धतीने सजवलं आहे.
-
अनिल कपूरची मुलगी सोनम हिच्या लग्नातील अनेक विधी आणि मनोरंजनपर कार्यक्रम याच घरात पार पडले.
-
अनिल कपूरच्या घरातील पुस्तकांचा संग्रह पाहून अंदाज लावता येऊ शकतो की त्याला वाचनाची किती आवड आहे.
-
सर्व फोटो – सोशल मीडिया

२ एप्रिल पंचांग : ‘श्री लक्ष्मी पंचमीला’ मेष, वृषभसह ‘या’ राशींची सुखाने भरणार ओंजळ; आज तुम्हाला कसा मिळणार आशीर्वाद? वाचा राशिभविष्य