-
'भाभीजी घर पर है' या मालिकेतून नावारुपास आलेली फाल्गुनी रजनी छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुंदर चेहरा आणि अनोखी अभिनय शैली यामुळे लोकप्रिय झालेल्या फाल्गुनीने देखील रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी प्रचंड कष्ट केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
करिअरच्या सुरुवातीस तिला ऑडिशनमध्ये देखील कोणी उभं करायचं नाही. जनसत्ताला दिलेल्या मुलाखतीत फाल्गुनीने हा अनुभव सांगितला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
फाल्गुनी म्हणाली लहानपणापासूनच तिला अभिनयाची प्रचंड आवड होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. तिनं शिकून डॉक्टर किंवा इजिनियर व्हावं अशी तिच्या पालकांची इच्छा होती. परंतु तिने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन अभिनयात करिअर करण्याचं ठरवलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने कुठल्याची शास्त्रशुद्ध शिक्षणाशिवाय विविध ठिकाणी चित्रपट, मालिका आणि नाटकांसाठी ऑडिशन्स दिले. परंतु तिला रिजेक्ट केलं जायचं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिचा अभिनय पाहून सर्व जण तिच्यावर हसायचे. परंतु तिने हार मानली नाही. अभिनयाचं शिक्षण घेतलं अन् पुन्हा एकदा या क्षेत्रात आपलं नशीब आजमावून पाहिलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिच्या संघर्षावर कोणीतरी चित्रपट तयार करावा अशी तिची इच्छा आहे. मुलाखतीत हा अनुभव सांगताना फाल्गुनीला रडू कोसळलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने आजवर 'खिचडी', 'श्रीमान श्रीमती फिरसे', 'हप्पू की उलटन पलटन' यांसारख्या विनोदी मालिकांमध्ये लहान मोठ्या भूमिका साकारल्या. परंतु फाल्गुनीला खरी लोकप्रियता मिळाली ती 'भाभीजी घर पर है' या मालिकेमुळे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या मालिकेत तिने साकारलेल्या 'गुलफाम कली' ही व्यक्तिरेखा तुफान गाजली. परिणामी आता तिला 'गुलफान कली' या टोपननावानेच ओळखले जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

माधुरी दीक्षितच्या पतीने घटवले तब्बल १८ किलो वजन; डॉ. नेने म्हणाले, “मांसाहार सोडला, दारू…”