-
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये राजकियदृष्ट्या तणाव असला तरी चित्रपट उद्योग मात्र त्याला अपवाद आहे.
-
भारतातील अनेक मोठ-मोठे चित्रपट पाकिस्तानातही प्रदर्शित होतात. शिवाय पाकिस्तानमधील अनेक कलाकार भारतीय सिनेसृष्टीत झळकताना दिसतात.
-
या यादीत आता आणखी नवं नाव जोडलं जात आहे.
-
प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री एलिझे नासिर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
-
या आगामी चित्रपटाचं नाव 'यारावे' असं आहे. लवकरच दुबईमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
-
एलिझे ही पाकिस्तान सिनेसृष्टीतील एक आघाडिची आभिनेत्री आहे.
-
तिने मॉडलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
-
तीन वर्ष मॉडलिंग केल्यानंतर तिने अभियसृष्टीत काम करण्याचा निर्णय घेतला.
-
यापूर्वी लंडनमध्ये जाऊन तिने अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आहे.
-
'यलगार' आणि 'वॉर २' या सुपरहिट पाकिस्तानी चित्रपटामध्ये ती झळकली आहे.

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…