-
‘खणाची साडी’ महाराष्ट्राच्या परंपरेचा एक भाग. वेगळ्या रंगाढंगात आता या खणांच्या साड्या पाहायला मिळत आहेत. हल्लीच्या काळात या साड्यांना खास डिझाइन केलं जातय आणि मराठी अभिनेत्रींनी या साड्यांना खूपच पसंती दिली आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य- ऐश्वर्या नारकर/ इन्स्टाग्राम )
-
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी इन्स्टाग्रामवर खणाच्या साडीतले फोटो शेअर केले आहेत.
-
खणाच्या साडीमुळे ऐश्वर्या नारकर यांचं सौदर्य खुलून आलं आहे.
-
नाटक, मालिका आणि चित्रपटातून एक गोजिरी अभिनेत्री प्रेक्षकांपर्यंत पोहोचली ती म्हणजे ऐश्वर्या नारकर.
-
त्यांच्या प्रत्येक कामाची चर्चा केवळ मराठीत नाही तर हिंदीतही होते.
-
‘या सुखांनो या’ मालिकेतील हळवी भूमिका ते ‘लेक माझी लाडकी’ मालिकेतून दिसलेली नकारी छटा असलेली भूमिका, या सर्व प्रवासात त्यांच्या भूमिका कायम लक्षात राहिल्या.
-
अर्थात नाटक आणि सिनेमांपेक्षा त्यांनी मालिकेतून अधिक काळ काम केल्याने महाराष्ट्रातील तमाम गृहिणी वर्गाच्या त्या लाडक्या ठरल्या.
-
आजवरच्या कारकीर्दीत 'स्वामिनी' या मालिकेत त्यांनी पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिका साकारली.
-
खणाच्या या साडीमध्ये ऐश्वर्या नारकर खूप सुंदर दिसत आहेत.
-
आजवर सोज्वळ, संवेदनशील आणि प्रेमळ अशा अनेक भूमिका केल्या.
-
ऐश्वर्या नारकर या मराठी अभिनेते अविनाश नारकर यांच्या पत्नी आहेत.
-
ऐश्वर्या नारकर यांनी 'झुळूक' या चित्रपटात खूप सुंदर भूमिका साकारली आहे. त्यासाठी त्यांचे विशेष कौतुकही करण्यात आले होते.
-
ऐश्वर्या नारकर यांच्या अभिनयाची सुरुवात शालेय जीवनापासूनच सुरु झाली.
-
'महाश्वेता' हि त्यांची टीव्ही वरील पहिली मालिका होती.
-
खणाच्या या साडीमध्ये ऐश्वर्या नारकर खूप सुंदर दिसत आहेत.

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल