-
'खिलाडीयोंका खिलाडी' हा अभिनेता अक्षय कुमारच्या करिअरमधील एक सुपरहिट चित्रपट चित्रपट होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
याच चित्रपटामुळे अक्षय खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाला असं म्हटलं जातं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अक्षयच्या धमाकेदार अॅक्शनसोबत हा चित्रपट WWE सुपरस्टार अंडरटेकरमुळे विशेष चर्चेत होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'खिलाडीयोंका खिलाडी'मध्ये खलनायकाच्या रुपात रेसलिंग सुपरस्टार अंडरटेकर झळकला होता. परंतु खरं सांगायचं झालं तर हा खरा अंडरटेकर नव्हता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
WWE मध्ये अंडरटेकर हे गिमिक करणाऱ्या व्यक्तीचं नाव मार्क विल्यम कॅलवे असं आहे. मात्र चित्रपटात अंडरटेकरच्या रुपात अभिनेता ब्रायन ली झळकला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ब्रायन हा मार्कचा सावत्र भाऊ आहे. तो बराचसा मार्कसारखाच दिसतो त्यामुळे चित्रपटात त्याला अंडरटेकरच्या रुपात दाखवण्यात आलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे खिलाडीयोंका खिलाडीमुळे ब्रायन देखील रातोरात प्रसिद्ध झाला. त्याला इतकी प्रसिद्धी मिळाली की मार्कच्या अनुपस्थितीत तो WWE मध्ये अंडरटेकरचं गिमीक साकारायचा. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पुढे हे गिमिक इतकं गाजलं की WWE मध्ये अंडरटेकर (मार्क) विरुद्ध अंडरटेकर (ब्रायन) ही फाईट झाली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
खरा अंडरटेकर कोण आहे? अशी हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. अंडरटेकर कधीही हरत नाही या पार्श्वभूमीवर जो जिंकेल तो खरा अंडरटेकर असेल असा समज त्यावेळी प्रेक्षकांमध्ये होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अर्थात 'खिलाडीयोंका खिलाडी' या चित्रपटामुळे भारतातही या फाईटची प्रचंड चर्चा होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण