अभिनेता जिमी शेरगिलचं खरं नाव जसजीत सिंह शेरगिल आहे. त्याने बॉलिवूडसोबतच काही पंजाबी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. माचिस या चित्रपटातून जिमीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं फार कौतुक झालं होतं. जिमी त्याच्या भावाच्या बोलण्यावरून मुंबईला आला होता. मुंबईला जाऊन अभिनयाचं प्रशिक्षण घेण्याचा सल्ला त्याच्या एका भावाने दिला होता. त्यानुसार जिमीने मुंबईत येऊन अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. १९९६ साली जिमीने त्याच्या करिअरची सुरुवात केली. माचिस या पदार्पणाच्या चित्रपटातच जिमीला ओळख मिळाली आणि त्यानंतर मोहब्बतें चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. जिमीने २००१ मध्ये प्रियांकासोबत प्रेमविवाह केला. त्यांना एक मुलगा असून त्याचं नाव वीर असं आहे.
९ फेब्रुवारी राशिभविष्य: त्रिपुष्कर योगात मेष, मीन राशींच्या सुखाचा होणार शुभारंभ; कोणाची इच्छापूर्ती तर कोणाच्या आयुष्यात होतील अनपेक्षित बदल