-
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'लुडो' चित्रपट आणि 'मिसमॅच' सीरिजमधून अनेकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे रोहित सराफ. त्याला करिअरच्या सुरुवातीला रिजेक्शनचा सामना करावा लागला होता. याचा खुलासा त्याने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला होता. चला जाणून घेऊया रोहित विषयी काही खास गोष्टी…
-
रोहितचा जन्म ८ डिसेंबर १९९६ मध्ये नेपाळमध्ये झाला.
-
रोहितने मुंबईमधील सेंट फ्रान्सिस डी'एसीसी हायस्कूल मधून शालेय शिक्षण घेतले आहे.
-
त्याने एक डान्सर म्हणून करिअरची सुरुवात केली होती.
-
त्यानंतर त्याने काही मालिकांमध्ये काम केले आहे.
-
अभिनेता शाहरूख खान आणि आलिया भट्टच्या 'डिअर जिंदगी' या चित्रपटातून रोहितने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
या चित्रपटात त्याने आलियाच्या लहान भावाची भुमिका साकारली होती.
-
त्यानंतर रोहितने 'वॉट विल पिपल से' या चित्रपटात काम केले.
-
२०१८ मध्ये, रोहितने यशराज फिल्म्सच्या कॉमेडी-ड्रामा हिचकीमध्ये भुमिका साकारली होती, ज्यात राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होती.
-
त्यानंतर प्रियांका चोप्राच्या द स्काय इज पिंक या चित्रपटात तो दिसला होता.
-
आता रोहितचे लागोपाठ एक चित्रपट आणि मालिका प्रदर्शित झाले आहेत. अनुराग बासूच्या 'लुडो' चित्रपटात आणि यूट्यूबर प्राजक्ता कोळीसोबत मिसमॅच या मालिकेत रोहितने मुख्य भुमिका साकारली आहे.
-
अनुराग बासूच्या 'लुडो' चित्रपटात आणि यूट्यूबर प्राजक्ता कोळीसोबत मिसमॅच या मालिकेत रोहितने मुख्य भुमिका साकारली आहे.
-
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या करिअर विषयी सांगितले आहे. सुरुवातीला त्याला सतत नकार मिळत होता.
-
एखाद्या भूमिकेसाठी मला जेव्हा नकार मिळायचा तेव्हा मी त्या विषयी खूप विचार करायचो. माझ्या स्वत:मधील उणिवा शोधून काढयचो. नंतर मी स्वत:ची समजूत घातली की मी एक अभिनेता म्हणून खूप चांगला आहे पण बहुतेक त्या भूमिकेसाठी मी योग्य नसेल' असे रोहित म्हणाला.
-
पुढे रोहित म्हणाला, 'अशा क्षेत्रात काम करणे म्हणजे कधी ना कधी नकार हा मिळतोच. मला मिळालेल्या नकारांमुळे मला खूप काही शिकायला मिळाले. त्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो आहे.'

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल