संपूर्ण साजशृंगार पूर्ण झाला तरी ज्याच्याशिवाय चेहऱ्याला रूप येत नाही असा दागिना म्हणजे नाकातली चमकी अथवा नथ हे आभूषण. फक्त सणासुदीला नाही तर दरदिवशी तयार होताना सामान्य महिला किंवा मराठी सेलिब्रिटी स्वत:ची एक वेगळी स्टाइल तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. या फॅशनमध्ये नाकातली चमकी व नथीला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. जुन्याच फॅशनला थोडेसे आधुनिक तडका देऊन ही फॅशन पुन्हा बाजारात येऊ पाहात आहे. -
हिंदी चित्रपटातील एखादं गाणं असो वा मराठी मालिका सध्या नथ ही एक महत्त्वाचा दागिना झाला आहे.
-
नवा साज घेऊन आलेल्या मराठी दागिन्यात नथीचा मान मोठा आहे.
-
महाविद्यालयीन मुलींपासून ते अभिनेत्रीपर्यंत मराठमोळी नथ आता स्टाइल स्टेटमेंट झाली आहे.
-
नासिकाभूषण है सौभाग्यलंकार मानले गेल्याने प्रत्येक प्रांतात आणि परंपरामध्ये तिला वेगळे स्थान आहे.
-
महाराष्ट्रापासून पश्चिम बंगालपर्यंत व काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या भारताचे सांस्कृतिक वैविध्य अतुलनीय आहे.
-
प्रत्येक प्रदेशाची संस्कृती वेगळी, परंपरा वेगळ्या. प्रत्येक प्रांताच्या दागिन्यांची घडनावळ वेगळी, त्याचे महत्त्व वेगळे, त्यांचा हेतू वेगळा.
-
पण भारतभर विखुरलेल्या विविध राज्यांमधील ही दागिन्यांची आवड आणि महत्त्व त्यांना कायम जिवंत ठेवणार यात शंका नाही.
-
मोती आणि सोन्याचा योग्य वापर या नथीमध्ये केल्याने तुमचं सौंदर्य अधिकच खुलून येतं.
-
नथ हा पेशवाई संस्कृतीने अजरामर केलेला महाराष्ट्रीय दागिना.
-
नथीमध्ये पूर्वीपासूनच्या पारंपरिक नक्षी रूढ आहेत. (सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार