-
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा प्रेक्षकंना प्रचंड आवडते. मुनमुन दत्ता हे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारे पात्र आहे. (सर्व फोटो सौजन्य – मुनमुन दत्ता इन्स्टाग्राम)
-
अभिनयाच्या बरोबरीने सौंदर्यामुळेही मुनमुन दत्ता लक्ष वेधून घेतात. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील बबिता जीं ची त्यांची व्यक्तीरेखा नेहमीच चर्चेत असते. बबिता, अय्यर आणि जेठालालची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावते.
-
२००४मध्ये मुनमुनने 'हम सब बाराती' या मालिकेमध्ये काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर मुनमुनने चित्रपटांमध्ये ही काम केले आहे.
-
मुनमुनने पत्रकार व्हावे अशी तिच्या कुटुंबीयांची इच्छा होती. पण ती एक अभिनेत्री झाली. करिअरच्या सुरुवातीला मुनमुन फॅशने शोमध्ये सहभागी झाली होती.
-
मुनमुन 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत काम करत आहे.ती मालिकेतील एका भागासाठी जवळपास ३० ते ३५ हजार रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.
-
मुनमुन यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले होते, त्यावरुन त्या मालिकेतील एका कलाकाराला डेट करत असल्याची माध्यमांमध्ये चर्चा झाली होती.
-
मुनमुन दत्ताने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती आणि राजा अनादकट म्हणजे टप्पू एका रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट अन्न-पदार्थांचा अस्वाद घेत असल्याचे ते फोटो होते. त्यावेळी मुनमुन टप्पूला डेट करते का? अशी चर्चा झाली होती.
-
मुनमुन दत्ता आपल्या फिटनेसवर विशेष मेहनत घेते. या फिटनेसमुळेच तिचे सौंदर्य अधिक खुलून येते. आरोग्यदायी आहार आणि वर्कआउट यामध्ये त्यांच्या फिटनेसचे रहस्य दडले आहे.
-
मुनमुन वेट ट्रेनिंगही करतात. जवळपास दीड तास व्यायाम करत असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
-
३३ वर्षीय मुनमुन आपल्या फिटनेस आणि ब्युटी रुटीनचे कटाकक्षाने पालन करते. शेडयुल कितीही बिझी असले तरी वर्कआउट कधीही चुकवत नाही. मुनमुन दत्ता व्यायामाच्या जोडीने स्ट्रेंथ ट्रेनिंगही करतात.
-
मुनमुन वेट ट्रेनिंगही करतात. जवळपास दीड तास व्यायाम करत असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
-
एरोबिक्सच्या जोडीला मुनमुन योगासनेही करतात. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुनमुन व्यायामाचे फोटोही शेअर करतात.
-
व्यायामाच्या बरोबरीने मुनमुन आपल्या खाण्याकडेही विशेष लक्ष देतात. बाहेर खाणे त्या जास्तीत जास्त टाळतात
-
मुनमुन फिटनेसकडे लक्ष देत असली, तरी ती फुडी आहे. माझे मेटाबॉलिज्म हाय असल्यामुळे वजन जास्त वाढत नाही असे मुनमुनने एका मुलाखतीत सांगितले होते.
-
बबिता ही व्यक्तिरेखा कायमच चर्चेत असते. मुनमुन दत्ता अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते.
-
सोशल मीडियावर मुनमुन दत्ताचे मोठया प्रमाणावर फॉलोअर्स आहेत.

Pahalgam Terror Attack: “हे दहशतवादी फार काळजीपूर्वक…”, काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या पाठलागाचा थरार; ५ दिवसांत ४ वेळा ठावठिकाणा लागला पण…