आपल्या सौंदर्यांमुळे आणि उत्तम अभिनयशैलीमुळे चाहत्यांच्या मनाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे. फुलपाखरु या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या ऋताचे आज असंख्य चाहते आहेत. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक माहिती जाणून घेण्यासाठी चाहते आतूर असतात. काही गाजलेल्या मालिकांमध्ये काम केल्यानंतर ऋता चित्रपट किंवा वेब सीरिजमध्ये कधी झळकणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. चाहत्यांच्या याच प्रश्नांना आता पूर्ण विराम मिळणार आहे. कारण, ऋता लवकरच एका वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. ऋता पहिल्यांदाच वेब विश्वात पदार्पण करत असून या आगामी सीरिजमध्ये ती मुख्य भूमिका साकारत आहे. 'डुएट' असं ऋताच्या आगामी सीरिजचं नाव असून या सीरिजमध्ये ती नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सीरिजमध्ये ऋता, अदिती हे पात्र साकारत आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत नेमका कोणता कलाकार स्क्रीन शेअर करणार हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही. ओपनिंग फ्रेम मिडिया अंतर्गत या सीरिजची निर्मिती करण्यात येत असून शोनिल यल्लत्तीकर हे दिग्दर्शन करत आहेत. ’ डुएट ' हे माझ्या पहिल्या वेब सीरिजचं नाव आहे आणि मी खूपच एक्साइट आहे. मुख्य म्हणजे ही आजच्या काळातील गोष्ट आहे. या सीरिजमध्ये मी अदिती हे पात्र साकारत आहे. सोबतच पुन्हा एकदा स्ट्रॉबेरी शेकच्या टीमसोबत मला काम करण्याची संधी मिळत आहे, असं ऋता म्हणाली. -
ऋता दुर्गुळेचा सेटवरील फोटो
-
ऋता दुर्गुळे आणि तिची वेब सीरिजची टीम

बोल्ड कंटेंटमुळे थिएटरमध्ये प्रदर्शित न होऊ शकलेले ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी