सध्या अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यातलीच एक मालिका म्हणजे जय जय स्वामी समर्थ. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेली ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ( सौजन्य : अक्षय मुदवाडकर फेसबुक पेज) 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनावर आधारित आहेत. त्यामुळे कमी कालावधीत ही मालिका तुफान लोकप्रिय होत आहे. ही मालिका सुरु झाल्यापासून यात स्वामींची भूमिका साकारणारा अभिनेता नेमका आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या मालिकेत अक्षय मुदवाडकर या अभिनेत्याने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. लहानपणापासून अभिनयाची आवड असणारा अक्षय मूळचा नाशिकचा. या मालिकेव्यतिरिक्त त्याने अनेक प्रायोगिक, व्यावसायिक नाटकं केली आहेत. 'गांधी हत्या आणि मी',' द लास्ट व्हॉइसरॉय' या नाटकात त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. 'स्वराज्य जननी जिजामाता' या मालिकेतही तो झळकला आहे. अक्षयचं एक युट्यूब चॅनेल असल्याचं देखील सांगण्यात येतं. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेला अक्षय अनेकदा त्याचे मित्रपरिवार, कुटुंबीय यांच्यासोबतचे फोटो शेअर करत असतो.

२७ मार्च पंचांग: प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रीचा शुभ संयोग मेष ते मीनच्या आयुष्यात कसे घेऊन येईल सुख; वाचा राशिभविष्य