सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’. या मालिकेत ज्योतिबाची भूमिका साकारणारा अभिनेता सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनेता विशाल निकम या मालिकेत ज्योतिबाची भूमिका साकारत आहे. व्यस्त शेड्युलमुळे रोज वर्कआऊट करणं किंवा जीमला जाणं शक्य नसल्यामुळे विशाल सेटवरच फावल्या वेळात वर्कआऊट करत आहे. सेटवरील वस्तूंचा वापर करुन विशाल त्याचं फिटनेस जपत आहे. भूमिकेला न्याय देण्यासाठी विशाल कसोशीने प्रयत्न करत असून तो त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. या भूमिकेसाठी तो प्रचंड मेहनत घेत आहे. भूमिकेसाठी फिटनेस राखणं अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळेच विशालने हा नवा मार्ग शोधून काढला आहे. सेटवरच्या वस्तूंचा वापर करत त्याने सेटलाच जीम बनवलं आहे. दररोजचा व्यायाम असल्यामुळे विशालला फिटनेस राखणं शक्य झालं आहे.
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच