मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर. ( सौजन्य : मिताली मयेकर/ सिद्धार्थ चांदेकर इन्स्टाग्राम पेज) लवकरच सिद्धार्थ आणि मिताली लग्नाच्या बंधनात बांधले जाणार आहेत. सध्या या दोघांच्या घरी लग्नापूर्वीच्या विधी, सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. याचे काही फोटो सिद्धार्थ आणि मितालीने सोशल मीडियावर शेअर केले आहे. मितालीने तिच्या मेहंदी सोहळ्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या सोहळ्यासाठी मिताली आणि सिद्धार्थ यांनी खास थीम ठेवली आहे. मितालीने हिरव्या आणि ऑफ व्हाइट रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तर, सिद्धार्थनेदेखील हिरव्या रंगाचा कुर्ता घातला आहे. मितालीची मेहंदी खास असून तिने तिच्या मेहंदीमध्ये पांडाचं चित्र रेखाटलं आहे. मितालीचं तिच्या पाळीव श्वानावर प्रचंड प्रेम असून या लग्नसोहळ्यातील प्रत्येक कार्यात तिची डोरा दिसून येत आहे. मिताली- सिद्धार्थचा लग्नसोहळा पुण्यात रंगणार असल्याचं म्हटलं जात आहे. सिद्धार्थने देखील या मेहंदी सोहळ्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. २०१९ मध्ये सिद्धार्थ-मितालीचा साखरपुडा पार पडला. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.

मुंबई लोकलमध्ये कपलनं सर्व मर्यादा ओलांडल्या; गर्लफ्रेंडला मांडीवर बसवलं अन्…, VIDEO पाहून तुम्हालाही धक्का बसेल