-
गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी चर्चेत आहे. तिने तिचा मित्र प्रेम मोदीसोबत शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चा रंगल्या होत्या. पण आता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे चर्चेत आहे.
-
या चर्चा अभिनयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे सुरु झाल्या आहेत.
-
अभिनयनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता.
-
त्याने स्वत:चा फोटो शेअर करत 'आरंभ' असे कॅप्शन दिले आहे.
-
या कॅप्शननंतर सोशल मीडियावर तो 'आदिपुरुष' या चित्रपटात काम करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
दिग्दर्शक ओम राऊत ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाच्या यशानंतर आता 'आदिपुरुष' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
-
या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करताना त्यांनी आदिपुरुष चित्रपटाचे पोस्टर आणि 'आरंभ' असे म्हटले होते.
-
अभिनवने देखील स्वत:चा फोटो शेअर करत 'आरंभ' असे कॅप्शन दिल्यामुळे सोशल मीडियावर तो 'आदिपुरुष' या चित्रपटात काम करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास, अभिनेता सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
-
हा चित्रपट 3D अॅक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा असून भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत.
-
२०२२ मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
आता अभिनयदेखील या चित्रपटात काम करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
एका चाहत्याने अभिनयच्या या पोस्टवर आदिपुरुष का? अशी कमेंट केली होती. त्यावर अभिनयने मी आधी पासूनच पुरुष आहे असे मजेशीर अंदाजात म्हटले आहे.
-
अभिनयने अद्याप तो आदिपुरुष चित्रपटात दिसणार की नाही हे सांगितलेले नाही.
-
अभिनयने 'ती सध्या काय करते', 'रंपाट' या चित्रपटांमध्ये काम केले आहेत.
आता दु:खाचे दिवस संपणार! चैत्र पौर्णिमेच्या आधी ‘या’ राशींच्या दारी पैसा येईल चालून? रखडलेली कामे होऊ शकतात पूर्ण