-
राहुल रवैल यांच्या 'बेताब' या १९८३ सालच्या गाजलेल्या चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलेल्या अमृता सिंहने 'चमेली की शादी', 'आयना', 'मर्द', 'राजू बन गया जंटलमन' अशा अनेक चित्रपटांमधून अभिनय केला. अलिकडच्या काळात तिने 'हिंदी मिडियम' चित्रपटात साकारलेली शाळेच्या मुख्याध्यापिकेची भूमिका तिच्या चाहत्यांना विशेष भावली. अर्जुन कपूर आणि आलिया भट मुख्य जोडी असलेल्या 'टू स्टेटस्' चित्रपटात तिने साकारलेली 'पंजाबी आई' ही भूमिका चांगलीच वाखाणली गेली. वाढत्या वयाबरोबर चित्रपटांतील मुख्य भूमिकेपासून दुरावलेल्या अमृताने अन्य भूमिकांकडे मोर्चा वळवत बॉलिवडूमध्ये स्वत:चे खास स्थान निर्माण केलं. (Source: Photo by Express Archive Photo)
-
अमृताने तिच्यापेक्षा बारा वर्ष वयाने लहान असलेल्या सैफ अली खानशी १९९१ मध्ये लग्न केलं. परंतु, त्यांचा तेरा वर्षांचा संसार मोडला आणि २००४ साली दोघे विभक्त झाले. (Source: Photo by Express Archive Photo)
-
१९९३ साली तिला कन्यारत्न प्राप्त झाले, तर २००१ साली मुलाचा जन्म झाला. सारा अली खान ही अमृता आणि सैफची मुलगी बॉलिवूडमध्ये चांगलीच स्थिरावली आहे. तर, मुलगा इब्राहिम अली खान अनेकवेळा माध्यमांमधून दिसत असतो. (Source: Photo by Express Archive Photo)
-
अभिनयाचे विविध पैलू दर्शविणाऱ्या अमृताने नेहमी प्रयोगशील भूमिकांना प्राधान्य दिलं आहे. त्याचप्रमाणे आव्हानात्मक आणि धाडसी भूमिका असलेले चित्रपटदेखील न डगमगता स्विकारले आहेत. (Source: Photo by Express Archive Photo)
-
'काव्यांजली' या टीव्ही मालिकेतदेखील ती दिसली आहे. (Source: Photo by Express Archive Photo)
-
अमृताने कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी करिअरच्या शिखरावर असतांना १९९३ पासून स्वत:ला अभिनयापासून दूर ठेवलं. नंतर, २००२ साली '२३ मार्च १९३१: शहीद' या चित्रपटात तिने भगत सिंग यांच्या आईची भूमिका साकारत रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. (Source: Photo by Express Archive Photo)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”