-
गेल्या चार दशकांपासून कलाविश्वावर आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे जॅकी श्रॉफ. आजवरच्या कारकिर्दीत अमाप यश आणि प्रतिष्ठा मिळविणारे जॅकी श्रॉफ अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून वर आले आहेत.एकेकाळी लहानशा घरात राहणाऱ्या जॅकी श्रॉफ याचं आज मुंबईत प्रशस्त घर असून खंडाळा येथे एक फार्महाऊसदेखील आहे. त्यामुळेच त्यांचं फार्महाऊस नेमकं कसं आहे ते पाहुयात.
-
जॅकी श्रॉफ यांचा मुंबईमध्ये बंगला आहे. तसेच खंडाळा येथे त्यांचं अलिशान फार्महाउसदेखील आहे.
-
जॅकी श्रॉफ यांच्या फार्महाऊसवर प्रत्येक गोष्टीकडे, सोयीसुविधांकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्यात आलं आहे.
-
त्यामुळे त्यांचा हा फार्महाऊस अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त आहे.
-
अनेकदा या फॉर्महाऊसमध्ये जॅकी श्रॉफ गेट टू गेदर किंवा पार्टी करत असतात.
-
कलाविश्वात रमणारे जॅकी शेती करण्यातही तितकेच रमतात. त्यामुळे त्यांनी फार्महाऊसवर सेंद्रिय शेती सुद्धा केली आहे.
-
या फार्महाऊसमध्ये असलेला सुंदर स्विमिंग पूल.
-
अत्याधुनिक सोयी असलेला फार्महाऊस अत्यंत सुंदररित्या डिझाइन करण्यात आला आहे.
-
या फार्महाऊसला चहुबाजूंनी डोंगरांनी वेढलं असून समोर खुलं मैदानदेखील आहे.
-
( फोटो सौजन्य : आयशा श्रॉफ/ इंस्टाग्राम,सोशल मिडिया )

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल