-
बॉलिवू़डमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे काजोल आणि अजय देवगण यांची जोडी. काजोल आणि अजय देवगणच्या लग्नाला आज 22 वर्ष पूर्ण होत आहेत. पडद्यावर दिसणाऱ्या काजोल अजयच्या केमिस्ट्रीपेक्षाही खऱ्या आयुष्यात दोघांचं नात अधिक मजबूत आहे. वडिलांच्या विरोधात जाऊन काजोलने अजय देवगणसोबत लग्न केलं अससं तरी आज मात्र तिला तिच्या निर्णयाचा अभिमान आहे. काजोल आणि अजय देवगणची प्रेम काहाणी देखील खुप इंटरेस्टींग आहे.(photo credit-instagram@kajol and ajaydevgn)
-
1995 सालात 'हलचल' या सिनेमाच्या सेटवर काजोल आणि अजय देवगण पहिल्यांदा एकमेकांना भेटले. मात्र यावेळी दोघांमध्ये कोणतीच प्रेमभावना नव्हती. सुरुवातीला तर अजय देवगणला काजोलचा स्वभावही आवडला नव्हता. त्याच्या दृष्टीने काजोल ही एक उद्धट आणि बडबडी मुलगी होती. त्याला तर काजोला पुन्हा भेटण्याची इच्छाही नव्हती. तर काजोलला मात्र अजय खुप संयमी आणि शांत वाटला.
-
या सिनेमानंतर दोघं एकमेकांना दोन वर्ष भेटलेदेखील नाही. काजोल एका वेगळ्या नात्यात यावेळी गुंतलेली होती. तर अजयचीदेखील एक गर्लफ्रेंड होती.
-
गुंडाराज या सिनेमाच्या निर्मितीदरम्यान काजोल आणि अजय पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले आणि त्यांनी एकमेकांना डेट करणं सुरु केलं.
-
एका मुलाखतीत काजोलने दोघांची जवळीक कशी झाली याबद्दल सांगितलं होत. काजोल तिच्या आधीच्या प्रेमप्रकरणामुळे चिंताग्रस्त होती. त्या नात्यात काही समस्या येत असल्याने तिने अजयसोबत चर्चा केली. मन मोकळ करण्यासाठी तिने अजयचा सल्ला घेतला. यावेळी दोघांची मैत्री झाली. कालांतराने याच मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.
-
चार वर्षांच्या अफेअरनंतर अजय देवगण आणि काजोलने लग्न करण्याचा निर्णय घेतला. कोणालाही लग्नाची कल्पना न देताच त्यांनी गुपचूप लहानसा लग्नसोहळा उरकला. खास बात म्हणजे दोघांपैकी कुणीही एकमेकांना I love You म्हणत प्रपोज केलं नाही. असं अजयनेच एका मुलाखतीत सांगितलं.
-
अजय देवगण आणि काजोल यांनी अगदी मराठमोळ्या पद्धतीनं लग्न केलं. मीडियापासून दूर राहण्यासाठी या लग्नाची कुणालाही कल्पना देण्यात आली नव्हती. काजोलच्या वडिलांचा शोमू मुखर्जी यांचा या लग्नाला विरोध होता. करिअरकडे दुर्लक्ष करत काजोल अवघ्या 24 व्या वर्षी लग्न करतेय हे त्यांना पसंत नव्हत. असं असलं तरी काजोलची आई तनुजा यांनी दोघांच्या लग्नाला सपोर्ट केला.
-
काजोल आणि अजय देवगण यांच्या लग्नाला आज 22 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांना न्यासा आणि युग ही दोन मुलं आहेत. अजय आणि काजोलला कुटुंबासोबत वेळ घालवणं आवडतं.
-
तानाजी सिनेमात अनेक वर्षांनंतर काजोल आणि अजयची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या जोडीला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली.
-
अजय देवगण अजिबात रोमॅण्टिक नसल्याचं काजोलने एका मुलाखतीत म्हंटलय. "गुलाब घेऊन येणं किंवा लग्नाच्या वाढदिवसाला काही सरप्राईज देणं हा अजयचा स्वभाव नाही. मात्र त्याचं माझ्यावर आणि त्याच्या कुटुंबावर खुप प्रेम असल्याचं" काजोलन मुलाखतीत म्हंटलंय.
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच