-
अभिनेता टायगर श्रॉफचा आज 31वा वाढदिवस आहे. वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत टायगरनेदेखील बॉलिवूडमध्ये येत चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 'हिरोपंती' या सिनेमातून टायगरने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. टायगरच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
-
बॉलिवूडमध्ये टागर श्रॉफ या नावाने चाहत्यांची पसंती मिळवलेल्या टागरचं खरं नावं जय हेमंत श्रॉफ असं आहे. 2014 मध्ये टायगरने 'हिरोपंती' सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं. त्यानंतर 'बागी' आणि 'फ्लाईंग जट' या सिनेमातून टायगरने प्रेक्षकांची पसंती मिळवली. या सिनेमांमधून टागरला खास करुन अॅक्शन हिरो म्हणून ओळख मिळाली.
-
मुंबईतील अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे इथून टायगरने त्याचं शालेय शिक्षण पूर्ण केलंय. अभिनेत्री श्रद्धा कपूर ही टायगरची शालेय मैत्रिण होती. यानंतर सिनेसृष्टीत आल्यानंतर श्रद्धा आणि टायगरने बागी या सिनेमातून एकत्र कामदेखील केलं.
-
टागर श्रॉफने तायक्वोंदोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. त्याचसोबत टायगरला लहानपणापासूनच डान्सची आवड होती. मायकल जॅक्सन आणि ऋतिक रोशन हे त्याचे डान्स आयकॉन आहेत. इतकच नाही तर बॉलिवूडमध्ये टायगर ऋतिक रोशनला आपला गुरु मानतो.
-
टायगर श्रॉफला त्याच्या फिटनेसमुळे मोठी पसंती मिळताना दिसते. टायगरने मोठ्या मेहनतीने अॅब्स बनवले आहेत. तसचं त्याच्या मस्क्युलर बॉडीमुळे अनेक तरुणी त्याच्यावर फिदा आहेत.
-
फिट शरीरासाठी तो वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करणं पसंत करतो. अनेक तास जिममध्ये घालवण्यासोबतच मार्शल आर्ट, कराटे आणि कायक्वोंदेचे सराव करताना तो दिसतो. टायगर श्रॉफ त्याचे जिममधील अनेक व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो.
-
याच सोबत उत्तम आहार हे फिट राहण्यासाठी गरजेचं असल्याचं टायगरचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे टायगरला सिगरेट आणि दारुचं अजिबात व्यसन नाही. एका सिनेमासाठई टायगरला सिगरेट ओढावी लागली होती. मात्र हे त्याने फक्त भूमिकेची गरज म्हणून केलं होतं.
-
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी टायगरला ट्रोल व्हावं लागलं होतं. टायगर श्रॉफचे लूक मुलींसारखे असल्याचं म्हणत अनेकांनी त्याला ट्रोल केलं. मात्र टायगरने त्याच्या फिटनेसने आणि त्याच्या अभिनयाने टीका करणाऱ्यांना चांगलचं उत्तर दिलं.
-
डान्स, अॅक्शन, फिटनेस यामुळे तरुणींमध्ये टायगर श्रॉफला मोठी पसंती असली. तरी मुळात टायगरचा स्वभाव खुपच शांत आणि लाजाळू आहे. त्यामुळे बॉलिवूड पार्टी किंवा समारंभांमध्ये तो फारसा सहभागी झाल्याचं दिसतं नाही.
-
हॉट आणि बोल्ड अभिनेत्री अशी ओळख असलेल्या दिशआ पटानीसोबत टायगरची खास मैत्री असून दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. मात्र अजूनही याबाबतीत दोघांनी स्पष्टपणे खुलासा केलेला नाही. टायगर आणि दिशाला अनेकदा एकत्र स्पाट करण्यात आलंय.
-
तर आई आएशा आणि बहिण कृष्णासोबत वेळ घालवायला टायगरला आवडतं. तर आई हिच माझी सगळ्यात जवळची मैत्रिण असल्याचं टायगर अनेक मुलाखतींमध्ये म्हणाला आहे.
-
टायगर सोशल मीडियावरही चांगलाच अॅक्टीव असतो. जिम करतानाच्या व्हिडीओ सोबतच हॉट फोटो शेअर करत तो चाहत्यांना भुरळ घालताना दिसतो.
-
तर लवकरच टायगर 'बागी-4' आणि 'हिरोपंती-2' या सिनेमांमधून झळकरणार आहे.(photo credit- instagram@tigerjackieshroff)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई