-
दाक्षिणात्य कलाविश्वातील सर्वात स्टायलिस्ट अभिनेता म्हणून अल्लू अर्जुन ओळखला जाते. त्याची क्रेझ केवळ टॉलिवूडमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येदेखील असल्याचे पाहायला मिळते.
-
विशेष म्हणजे तरुणींमध्ये त्याची कमालीची क्रेझ आहे. मात्र अनेक तरुणींच्या मनावर राज्य करणारा हा अभिनेता मात्र एका लग्नात एका मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्याशीच त्याने लग्नगाठ बांधली.
-
अल्लू अर्जुनची लव्हस्टोरी फार कमी जणांना माहित असेल.
-
आज ६ मार्च रोजी अल्लू अर्जुनच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आपण जाणून घेऊया त्याची लव्ह स्टोरी.
-
एका मित्राच्या लग्नात अल्लू अर्जुन आणि स्नेहाची पहिली भेट झाली. खरंतर पहिल्या भेटीतच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
-
अल्लूने जेव्हा पहिल्यांदा स्नेहाला पाहिले तेव्हा तिने त्याच्याकडे पाहून स्मित हास्य केले. तिचे हे हास्य पाहूनच तो त्याक्षणी तिच्या प्रेमात पडला.
-
विशेष म्हणजे याच लग्नात त्यांनी एकमेकांचे फोन नंबर एकमेकांना दिला. त्यानंतर त्याचे फोनवर बोलणे सुरु झाले.
-
त्यावेळी स्नेहा नुकतीच अमेरिकेतून तिची मास्टर्सची डिग्री पूर्ण करुन भारतात परतली होती.
-
स्नेहा हैदराबादमधील एका प्रसिद्ध व्यावसायिकाची मुलगी होती. तर अल्लू अर्जुनदेखील त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर होता.
-
त्याने तेलुगु कलाविश्वात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. त्यामुळे स्नेहा त्याला एक सुपरस्टार म्हणूनच ओळखत होती.
-
विशेष म्हणजे अल्लू आणि स्नेहाच्या नात्याला घरातल्यांचा विरोध होता.
-
अल्लूने त्याच्या वडिलांना अनेक मिन्नतवाऱ्या केल्यानंतर ते स्नेहाच्या घरी अल्लूसाठी लग्नाची मागणी घालायला गेले.
-
मात्र स्नेहाच्या वडिलांनी या लग्नास नकार दिला.
-
परंतू अनेक प्रयत्न, विनवण्या करुन या दोघांनीही घरातल्यांना लग्नासाठी तयार केले.
-
त्यानंतर ६ मार्च २०११ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली.
-
दरम्यान, अल्लू अर्जुन आणि स्नेहाला अयान आणि अरहा ही दोन मुले आहेत.
-
अल्लू दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तो कायम चाहत्यांच्या संपर्कात असतो.

Rajeev Shukla: प्रभू रामचंद्रांचा पुत्र ‘लव’ यांच्या पाकिस्तानातील समाधीचं राजीव शुक्लांनी घेतलं दर्शन