-
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड.
-
मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारुन प्राजक्ताने तिच्यातील अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवून दिली.
-
उत्तम अभिनय कौशल्य आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी प्राजक्ता गायकवाड विशेष लोकप्रिय आहे.
-
मालिकेतील सहकलाकारासोबत झालेल्या वादानंतर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने 'आई माझी काळुबाई' ही मालिका मध्येच सोडली. या मालिकेवरून बराच वाद झाला होता. प्राजक्ताने अचानकपणे ही मालिका सोडल्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती.
-
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे प्राजक्ता यावेळी कोणत्याही मालिका किंवा वादामुळे नव्हे तर अन्य एका कारणासाठी चर्चेत आली आहे.
-
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने आपले नथ घातलेले काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
गेल्या काही वर्षांत या नथीचे अनेक प्रकार बाजारात आले, पण पारंपरिक नथीत कोणत्याही स्त्रीचं सौंदर्य अधिक खुलून येतं.
-
संपूर्ण साजशृंगार पूर्ण झाला तरी ज्याच्याशिवाय चेहऱ्याला रूप येत नाही असा दागिना म्हणजे नाकातली चमकी अथवा नथ हे आभूषण.
-
नथीच्या नखऱ्यात प्राजक्ताही अधिक खुलून दिसतेय…
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड /इन्स्टाग्राम)
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”