-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा आज वाढदिवस आहे. आलिया तिचा 27 वा वाढदिवस साजरा करतेय.. आपल्या अभिनयाच्या जोरावर आलियाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये यश मिळवण्यासाठी आलियाने मोठी मेहनतही घेतलीय. बॉलिवूडमधील आलियाचा प्रवास जाणून घेऊया.
-
2012 सालात करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इअर' या सिनेमातून आलियाने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला. या सिनेमात आलिया सोबत वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रानेदेखील बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. या सिनेमामुळे आलियाची क्यूट गर्ल अशी ओळख निर्माण झाली.
-
'स्टुडंट ऑफ द इअर' हा आलियाचा मुख्य अभिनेत्री म्हणून पहिला सिनेमा असला तरी आधी आलिया अवघ्या 6 वर्षांची अससताना एका सिनेमात झळकली होती. अक्षय कुमार आणि प्रिटी झिंटच्या 'संघर्ष' या सिनेमात आलियाने बालकराकाराची भूमिका साकारली होती.
-
'स्टुडंट ऑफ द इअर' नंतर आलियाने अनेक सिनेमांधून उत्तम भूमिका साकारल्या आहेत. मात्र पहिल्या सिनेमानंतर आलियाला अनेकदा ट्रोल व्हावं लागलं. काही अॅवॉर्ड सोहळ्यातील मुलाखतीत किंवा सोहळ्यांमध्ये आलियाला विचारल्या गेलेल्या प्रश्नांमुळे ती ट्रोल झाली. बालीश तसचं कमी बुद्धीमत्ता असलेली अभिनेत्री असं तीला ट्रोल केलं गेलं.
-
मात्र आलियाने तिच्या अभिनयाने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं. 2014 सालात आलेल्या आलियाच्या 'हायवे' सिनेमात तिने उत्कृष्ट अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली. या सिनेमामुळे तिच्या अभिनयाची दखल घेतली गेली.
-
2014 याच वर्षात '2 स्टेटस्' मधून तिचा रोमॅण्टिक अंदाज पाहायला मिळाला.
-
2014 मध्ये आलेल्या 'हम्टी शर्मा की दुल्हनिया' या सिनेमातील वरुण आणि आलियाची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली. तर या सिनेमातील आलिया भट्टच्या आवाजातील 'मे तेनू समझावा' हे गाणं चांगलच लोकप्रिय झालं.
-
यानंतर 2016 मध्ये प्रदर्शित झालेले आलियाचे 'अग्ली', 'शानदार', 'कपूर अॅण्ड सन्स', 'डिअर जिंदगी' हे सिनेमे फारसे हीट ठरले नाही.मात्र याच वर्षात आलेल्या 'उडता पंजाब' या सिनेमाने आलियाच्या अभिनयाचं मोठं कौतुक झालं. आलियाचा चौकटी बाहेरील अभिनय या सिनेमातून झळकला. या सिनेमातील अभिनयासाठी तिला फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
-
. तर 2017 मध्ये ती 'बद्रिनाथ कि दुल्हनिया' या सिनेमात पुन्हा वरुण धवनसोबत झळकली. या सिनेमालादेखील चाहत्यांची मोठी पसंती मिळाली.
-
2018 सालात आलेल्या 'राझी' सिनेमातून देखील आलियाने सर्वोत्कृष्ट अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या सिनेमासाठीदेखील आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
-
. 'राझी' सिनेमासाठी आलियाने मोठी मेहनत घेतली होती. या सिनेमासाठी तिने गुप्तचर यंत्रणेत वापरण्यात येणाऱ्या भाषेचे धडे घेतले होते.
-
2019 सालात आलेल्या 'गली बॉय' या सिनेमाने तर धुमाकुळ घातला. या सिनेमातील रणवीरच्या अभिनयसोबत आलियाच्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावलं. या सिनेमातील आलियाचे डायलॉग चांगलेच व्हायरल झाले होते. .या सिनेमासाठी पुन्हा एकदा आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
-
दरम्यानच्या काळात आलेल्या आलियाच्या 'कलंक' आणि 'सडक-2' या सिनेमांना फारशी लोकप्रियता मिळाली नाही. असं असलं तरी आलियाने आजवर वगवेगळ्या भूमिका साकारत तिच्या अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केलीय.
-
लवकरच आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचा ट्रेरल रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील आलीयाच दमदार लूक आणि तिचा अभनिय लक्षवेधी ठरतोय. आलिया तिच्या प्रत्येक भूमिकेसाठी कसून मेहनत घेत असल्याचं तिने सिद्ध केलंय.
-
. लवकरच आलिया एसएस राजामौली यांच्या RRR या सिनेमात झळकणार आहे. या भूमिकेचं फर्स्ट लूक आलियाने नुकताच चाहत्यांसोबत शेअर केलाय. यात सिता नावाची भूमिका ती साकारतेय.(photo-instagram@aliabhatt/archive)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…