-
नुकताच 'लोकसत्ता तरुण तेजांकित अवॉर्ड' सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यात सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव याला देखील पुरस्कृत करण्यात आलंय.
-
सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या सोहळ्यातील त्याचे पुरस्कारासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. तसचं कॅप्शनमधून त्याने पुरस्कार मिळाळ्याचा आनंद व्यक्त केला आहे.
-
"मला लोकसत्ता तरुण तेजांकित अवॉर्ड मिळाला, माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहेच.. पण माझ्यासारख्याच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील 20 ध्येयवेड्या तरुणांच्या बरोबरीने हा अवॉर्ड मला मिळाला, याचा अभिमान आहे.. मनापासून धन्यवाद" असं तो कॅप्शनमध्ये म्हणाला आहे. तसचं त्याने या पुरस्कारासाठी आई-बाब आणि रसिक प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
-
या सोहळ्यासाठी सिद्धार्थने खास लूक केला होता. या स्टायलिश लूकमधील फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सिद्धार्थच्या फोटोंना चाहत्यांची मोठी पसंती मिळतेय.
-
सिद्धार्थला पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक मराठी सेलिब्रिटींनी त्याचं कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर तसचं अभिनेता अभिजीत खांडकेकर, सुयश टिळक यांनी सिद्धार्थला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
सिद्धार्थने मराठीसोबतच सिद्धार्थने हिंदी सिनेमांमधून देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.(photo-instagram@siddharth23oct)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल