-
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा आज वाढदिवस आहे. कंगनाच्या वाढदिवसानिमित्त 'थलायवी' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. मात्र, या आधीच कंगनाने 'थलायवी'मधील तिच्या लूक्सचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. चला पाहूया कंगनाचे चित्रपटातील लूक्स…
-
'थलायवी' हा चित्रपट तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. हा चित्रपट प्रदर्शना पूर्वीच वादांच्या भोवऱ्यात अडकला आहे. सोशल मीडियावर कंगनाच्या वक्तव्यांमुळे तिच्या या चित्रपटाला अनेक लोक विरोध करताना दिसत आहेत.
-
जयललिता यांना चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. त्यांना नेहमीच सांगितले जायचे की, एका जुनियर आर्टिस्टची मुलगी जुनियर आर्टिस्टच होणार. मात्र, त्यानी या सगळ्याकडे दुर्लक्ष केले.
-
त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि त्या सुपरस्टार झाल्या. त्यांची भूमिका साकारण्यासाठी कंगनाला खूप मेहनत करावी लागली.
-
जयललिता यांनी चित्रपटसृष्टीतून त्यांच्या कारकिर्दिला सुरुवात केली. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केल्या नंतर त्या राजकारणात वळल्या.
-
तिथे सुद्धा त्यांनी एक राजकारणी म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी गरिबांसाठी अनेक गोष्टी केल्या. त्यामुळे त्यांना 'अम्मा' असे देखील म्हणायचे.
-
या चित्रपटात जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी कंगनाने २० किलो वजन वाढवले होते. यातील कंगनाचे लूक्स पाहिल्यानंतर जयललिताच समोर असल्याचे वाटते होतो.
-
मात्र, कंगनाला त्यानंतर २० किलो वजन काही महिन्यातच कमी करणे खूप कठिण होते. त्यासाठी कंगनाने सकाळी जॉगिंग, योगा आणि वर्कआऊट करायला सुरूवात केली.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन ए एल विजय यांनी केले आहे. तर हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
येत्या २३ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (All photos credit – kangana ranaut instagram/ twitter)

५० वर्षांनंतर गुरुच्या राशीमध्ये निर्माण होईल मालव्य आणि लक्ष्मी नारायण राजयोग! या ३ राशीच्या लोकांना मिळेल अपार पैसा आणि पद प्रतिष्ठा