-
मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावरदेखील चांगलीच सक्रिय असते. मालिकांमधून सोज्वळ रुपात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या हिनाचा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर कायम पाहायला मिळतो.
-
नुकतेच हिना खानने मालदीवमधील तिचे काही बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हिना सध्या बॉयफ्रेण्ड रॉकीसोबत मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय.
-
मालदीवमधील रोज नवे फोटो हिना तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत आहे. मालदीवमध्ये पोहचताच सीप्लेनच्या सफरीचे फोटोदेखील तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
-
. त्यानंतर नुकतेच हिनाने समुद्र किनाऱ्यावरचे काही बोल्ड फोटो तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंना काही चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी मोठी पसंती दिली आहे.
-
. एक युजर हिनाला म्हणाला आहे. "मॅम जरा तरी लाज बाळगा". तर एका युजरने तिला तिच्या बिग बॉसमधील एका वक्तव्याची आठवण करून दिली आहे.
-
बिग बॉसच्या 14 पर्वात हिना खान निक्की तांबोळीला " मी तर शॉर्ट पॅन्टस् नाही घालत" असं म्हणाली होती. त्यामुळे हिनाच्या या बोल्ड फोटोवर नेटकऱ्यांनी टीका केली आहे.
-
हिनाने निळ्या रंगाच्या स्विमसूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला काहिंनी पसंती दिली असली. तरी काही नेटकऱ्य़ांनी हिनाला ट्रोल केलं आहे.
-
. तर काहिंनी हिनाला धर्मावरूनही ट्रोल केलं आहे. "आता कुणी नाही बोलणार इस्लाम धोक्यात आहे." अशी कमेंट एका युजरने केली आहे. दुसरा युजर म्हणाला आहे, "रमजान जवळ येतोय आता तरी सुधर."
-
हिनाने शेअर केलेल्या फोटोंना आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लाईकस् मिळाले आहेत. मात्र याच फोटोवरुन तिला ट्रोलर्सचा सामनादेखील करावा लागला आहे.
-
बिग बॉसच्या 12 पर्वात हिनाने अनेकदा वाद ओढावून घेतला होता. त्यानंतर सोशल मीडियावरूनही तिला ट्रोल केलं गेलं.(photo- instagram@realhinakhan)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल