-
अभिनेत्री अनुजा साठेने मराठी सोबतच हिंदी मालिका आणि सिनेमांमधून तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे. मराठी मालिकांमधून सुरु झालेला अनुजाचा प्रवास हिंदी सिनेमा आणि वेब सीरिजपर्यंत पोहचला आहे. अनुजाची 'एक थी बेगम' ही वेब सीरिज चांगलीच लोकप्रिय झाली होती.
-
'बाजीराव मस्तानी' आणि 'परमाणू' या सिनेमामधून अनुजाने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या अनुजा 'एक थी बेगम' या वेब सीरिजच्या दुसऱ्या भागाचं शूटिंग करतेय. हिमाचल प्रदेशमध्ये या सीरिज शूटिंग सुरु आहे.
-
अनुजाने शूटिंग दरम्यान मजा मस्ती करतानाचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत.
-
हिमाचल प्रदेशमधील प्रसिद्ध अशा सोलंग व्हॅलीमध्ये शूटिंग करत असताना अनुजाने बर्फात चांगलीच धमाल केली आहे. शिवाय बर्फवृष्टी होत असतानाचे काही स्लो मोशन व्हिडीओ तिने शेअर केले आहेत. अनुजाच्या या फोटो आणि व्हिडीओंना मराठी कलाकारांनी कमेंट दिल्या आहेत.
-
अभिनेत्री आणि अनुजाची मैत्रीण असलेल्या अभिज्ञा भावेने " अगं बाई स्नो परी" अशी मजेशीर कमेंट अनुजाच्या फोटोवर दिली आहे.
-
तर अभिनेत्री श्रेया बुगडे हिने देखील अनुजाच्या फोटोला कमेंट दिली आहे. या फोटोंमध्ये ती बर्फात जॅकेट घालून मजा करताना दिसतेय़.
-
अभिनेता सुयश टिळकने मला तुझा स्कार्फ आवडला असं कमेंटमध्ये म्हंटलं आहे.
-
‘एक थी बेगम’ ही सीरिज सत्यघटनेवरुन प्रेरित असून यातून अश्रफ भाटकर अर्थात सपनाचा जीवन प्रवास उलगडण्यात आला आहे. याच सीरीजचा दुसरा भाग लवकरच प्रेश्रकांच्या भेटीला येणार आहे.
-
या वेब सिरीजमध्ये अनुजाचा दमदार अंदाज पाहायला मिळाला होता. या सीरिजला प्रेक्षकांचीदेखील चांगली पसंती मिळाली होती.
-
अभिनेता सौरभ गोखलेसोबत अनुजाने लग्नगाठ बांधली आहे. सौरभही मराठी आणि हिंदी कलाविश्वात वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसतो. (photo- instagram@anujasatheofficial)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख