-
मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाच्या जोरावर अभिनेता वैभव तत्ववादीने स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. मराठी सिनेमांसोबतच 'हंटर', 'बाजीराव-मस्तानी', 'मणिकर्णिका' अशा सिनेमांमधून त्यांने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
-
वैभव लवकरच सोनीलिव्हच्या आगामी 'प्रोजेक्ट ९१९१'मध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या रूपात दिसणार आहे.
-
वैभव साकारत असलेली पंकज ही व्यक्तिरेखा 'प्रोजेक्ट ९१९१'च्या प्रमुख टीमच्या एका सदस्याची आहे .अत्यंत बुद्धिमान, प्रॅक्टिकल आहे आणि आपल्या हजरजबाबीपणामुळे टीममध्ये तो धमाल करतो.
-
वैभव तत्त्ववादी पंकजच्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाले की, “'प्रोजेक्ट ९१९१' सारख्या शोचा भाग होताना तसेच अत्यंत बुद्धिमान कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. पंकज ही व्यक्तिरेखा मी प्रत्यक्षात जसा आहे त्यापेक्षा खूप वेगळी आहे.
-
सत्यजीत शर्मा आणि वैभव तत्त्ववादी यांच्यासोबत 'प्रोजेक्ट ९१९१'मध्ये तृष्णा मुखर्जी, अभिषेक खान, मानिनी डे, जगत रावत, शरद कुमार यांच्याही व्यक्तिरेखा आहेत.
-
२६ मार्चपासून या शो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. वैभवचा एक हटके अंदाज या शोमध्ये पाहायला मिळणार आहे.
Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश