-
‘देवमाणूस’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत एसीपी दिव्या सिंहच्या एण्ट्रीने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. दिव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा खान प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या गॅलरीच्या माध्यमातून तिचा इथे पोहोचण्या पर्यंतचा प्रवास किती खडतर होता आणि तिने किती संघर्ष केले आहेत ते जाणून घेऊया…
-
नेहाचा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. तिची आई मराठी, तर वडील मुस्लीम. नेहा ही तिच्या वडीलांच्या तिसऱ्या बायकोची मुलगी आहे.
-
नेहाच्या आई-वडिलांचं लव्ह मॅरेज. धर्म वेगवेगळे असल्यामुळे दोन्ही कुटुंबांनी त्यांना स्वीकारलं नाही.
-
नेहाच्या आजोबांच निधन झाल्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ही नेहाच्या आईवर आली होती. त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती.
-
नेहाच्या आईने लग्न केल्यानंतर त्यांची परिस्थिती सुधारेल या आशेने त्यांनी आंतरधर्मीय विवाह केला. मात्र, लग्नानंतर त्यांच्या परिस्थितीत फारसा फरक पडला नाही.
-
नेहाच्या आईला प्रॉपर्टी मिळू नये, म्हणून काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि मारहाण केली होती. यामध्ये त्या खूप जखमी झाल्या होत्या आणि त्यांना ३७० टाके पडले.
-
हे पाहून नेहाच्या वडीलांनी पळ काढला. त्यानंतर नेहाच्या आईने तिचा आणि तिच्या भावाचा सांभाळ केला.
-
नेहाच्या शेजारच्या काकू तिला एक दिवस फोटो काढण्यासाठी स्टुडिओमध्ये घेऊन गेल्या होत्या. फोटो काढल्यानंतर फोटोग्राफरने "तुझे फोटो पेपरमध्ये देऊ का असे विचारले?"
-
"वडीलांचे आडनाव लावले तर माझ्या कुटुंबाच्या भावना दुखावतील म्हणून मी माझ्या आईचे आडनाव महल्ले लावले. माझा फोटो पाहून लोकांनी मला हीरोईन होण्याचा सल्ला दिला." असे नेहा एका मुलाखतीत म्हणाली.
-
नेहा खान ही अमरावतीची आहे. मुंबईला येण्यासाठी तिने खूप कष्ट केले. वडीलांना काही समजू नये म्हणून ती छोटी बॅग सोबत बाळगायची.
-
"फेसबुकवरुन ओळख झालेल्या ऑडिशन घेणाऱ्या लोकांना मी भेटायचे. कधी ट्रेन चुकली, तर पेपर टाकून स्टेशनवर झोपायचे." दोन-तीन वर्ष हा प्रकार केल्याचं नेहाने सांगितले.
-
किशोरी शहाणे आणि सतीश कौशिक यांचा सेक्रेटरी म्हणून काम केलेल्या अमरजीत सोबत तिची ओळख झाली. त्याने नेहाला मदत केली.
-
त्यानंतर 'युवा' हा चित्रपट तिला मिळाला. 'काळे धंदे', 'शिकारी' आणि 'गुरूकुल' सारख्या चित्रपटात तिने काम केले.
-
नेहा ही अप्रतिम डान्सर आहे. 'युवा डान्सिंग क्वीन'मध्ये ती स्पर्धक होती.
-
'देव माणूस' या मालिकेतून नेहाने सगळ्यांची मने जिंकली आहे. (All photo credit – neha khan instagram)
Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित