-
बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्राने नुकतच अमेरिकेत भारतीय रेस्टॉरंट सुरु केलं आहे. तिच्या या रेस्टॉरंटचे नाव 'सोना' आहे. न्यूयॉर्कमध्ये असलेलं प्रियांकाचं सोना रेस्टॉरंट अधिकृतरित्या सुरु झालं आहे. या रेस्टॉरंटमधील भारतीय मेजवानीजी झलक प्रियांकाने चाहत्यांसोबत शेअर केली आहे
-
"अप्रतिम भारतीय पदार्थ चाखण्याच्या तळमळीचं रुपांतर प्रेमात झालं आहे. मी तुम्हा सर्वाचं स्वागत करण्याची प्रतिक्षा करु शकतं नाही आणि आता तुम्हाला न्यूयॉर्क शहराच्या हृदयात अखंड भारत अनुभवता येईल." असं कॅप्शन देत प्रियांकाने सर्वांना निमंत्रण दिलं आहे.
-
यासाठी तिने संपूर्ण टीमचे तर आभार मानले आहेतच.शिवाय "सजावटीपासून, पदार्थ चाखून मेन्यू ठरवेपर्यंत आणि रेस्टॉरंटचं नाव सुचवण्यासाठी निक जोनसचे खास आभार." असं तिने पोस्टमध्ये म्हंटलं आहे. प्रियांकाच्या या रेस्टॉरंटचं नाव पती निक जोनस याने सुचवलं आहे. या रेस्टॉरंटसाठी त्यांना भारतीय नाव ठेवायचं होतं. निक आणि प्रियांकाच्या भारतातील लग्नादरम्यानं निकने अनेकदा सोना हा शब्द ऐकला होता. सोना म्हणजे गोल्ड..सोनं हे त्याला लक्षात आलं. त्यामुळे त्याने प्रियांकाला सोना नाव सुचवलं.
-
प्रियांकाने तिच्या या रेस्टॉरंटमधील काही पदार्थांचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सर्वांचं लक्ष वेधत आहेत. या फोटोत लज्जतदार भारतीय पदार्थ दिसतं आहेत. प्रियांकाच्या फोटोत तिच्या रेस्टॉरंटमध्ये डोसा आणि पकोडे म्हणजेच भजी उपलब्ध असल्याचं दिसतंय. डोसा खाण्यासाठी 22 अमेरिकन डॉरल म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये दीड हजार मोजावे लागतील.
-
. यासोबतच गोलगप्पा शॉटस्, चिज पालक समोसा, मालवणी कोळंबी करी, बटर चिकन आणि नान असे अनेक प्रसिद्ध भारतीय पदार्थ अमेरिकेतील लोकांना या रेस्टारंटमध्य़े चाखता येणार आहेत.
-
यात रोटी, नान, पराठा हे सर्व उपलब्ध असून 8 डॉलरला मिळेल. भारतीय रुपयांमध्ये जवळपास साडे पाचशे रुपये याचे होतात.
-
तर नारळाची खीर आणि गाजरचा हलवा असे प्रियांकाच्या आवडीचे पदार्थ तिने खास ठरवून घेतले आहेत. यासाठी 14 डॉरल भारतीय रुपयांमध्ये जवळपास हजार रुपये द्यावे लागतील.
-
मालवणी कोळंबी करीसाठी आणि बटर चिकनसाठी 28 डॉरल म्हणजे भारतीय रुपयांमध्ये जवळपास दोन हजार रुपये मोजावे लागणार.
-
बिर्याणी आणि पुलावचे वेगवेगळे प्रकार आणि तंदूरीदेखील इथे मिळणार आहे.
-
अमेरिकेतील सर्वसामान्यांना परवडेल असा मेन्यू तिने ठरवला आहे.
-
उत्तम शेफ, हरीनायक याने या रेस्टॉरंटचा मेन्यू ठरवला आहे. डिझायनर मेलिसा बॉवर्सने संपूर्ण हॉटेल डिझाइन केले आहे.
-
प्रियांकाचे मित्र मनीष गोयल आणि डेव्हिड रॉबिन यांनी तिला हे रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मदत केली आहे.(all photo- instagram@priyankachopra)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल