-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे वेदांगी कुलकर्णी. 'सूर राहू दे' आणि 'साथ दे तू मला' या मालिकांमधून वेदांगीने सगळ्यांची मने जिंकली. वेदांगीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यामाने याची माहिती तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
-
वेदांगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही बातमी काही फोटो शेअर करत दिली आहे.
-
"एक नवीन सुरूवात", अशा आशयाचे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
-
पुण्यात १९ मार्च रोजी वेदांगीचा साखरपुडा झाला आहे.
-
वेदांगीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव अभिषेक तीळगुळकर आहे.
-
वेदांगीचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज हे तिने अजून स्पष्ट केलेले नाही.
-
एवढंच नाही तर वेदांगी 'डान्स महाराष्ट्र डान्स' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग झाली होती.
-
'लंडनच्या आजीबाई' या नाटकात देखील वेदांगीने काम केले आहे.
-
वेदांगीने 'सूर राहू दे' आणि 'साथ दे तू मला' या मालिकांमध्ये काम केले आहे. 'साथ दे तू मला' या मालिकेत वेदांगीने प्राजक्ताची भूमिका साकारली होती. या मालिकेतून वेदांगीने सगळ्यांची मने जिंकली.
-
वेदांगीला डान्स आणि अभिनयाची आवड आहे. (All photo credit: vedangi kulkarni instagram)

मासिक पाळी आलेल्या विद्यार्थीनीबरोबर शाळेचं क्रूर कृत्य, आईने व्हिडिओ रेकॉर्ड केल्यामुळे सत्य आलं समोर; चौकशीचे आदेश