-
'राजा रानीची गं जोडी' मालिकेमध्ये होळी सोबत रंगाची उधळण पाहायला मिळणार आहे.
-
मालिकेमध्ये संजु – रणजीत आणि संपूर्ण ढाले पाटील परिवार हा सण एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे.
-
संजुचं PSI होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती दिवस रात्र मेहनत करत आहे, आणि आता तर तिला रणजीतची खंबीर साथ देखील मिळाली आहे.
-
मालिकेमध्य़े रणजीत आणि संजीवनीने रंगपंचमीची मजा लुटली आहे. रंगाच्या या उत्सवात दोघांच्या प्रेमाचे रंग बघरतात का? हे पाहणं उत्सुकतेचं असले.
-
तर या आनंदाच्या दिवशी रंगाच्या उत्सवासोबतच एखादं नाट्य रंगताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
-
रंगपंचमीच्या शूटिंगच्या निमित्ताने मात्र सर्वचं कलाकारांनी जबरदस्त धमाल केल्याचं पाहायला मिळतंय.
-
कोणतही सेलिब्रेशन म्हंटलं कि फोटो काढणं आलंचं. सगळेचं जण सण साजरा करतानाचे आनंदाचे क्षण कॅमेरात कैद करत असतात.
-
त्याच प्रमाणे मालिकेतील कलाकारांनादेखील फोटो काढण्याचा मोह आवरलेला नाही. शूटिंगमधून ब्रेक मिळताच फोटो सेशन सुरु झालं.
-
मालिकेत महत्वाची भूमिका साकारणाऱ्या शिवानी आणि मणिराज यांनी या सणाचा कलरफूल सेल्फी घेतानाही धमाल केली.
-
कोरड्या रंगांचा वापर करत ढाले पाटील कुटुंबात हा रंगपंचमीचा सण रंगला.
-
रंगपंचमीच्या सीनचं शूटिंग करताना कलाकारांनी एकमेकांना रंग लावण्याची एकही संधी सोडली नाही. मालिकेतील संजीवनी म्हणजेच शिवानी सोनारला अभिनेता मणिराज पवार याने चांगलंचं रंगवलं.
-
रंगामध्ये सर्वच जण असे रंगले होते कि काहिंना तर ओळखणंही कठीण झालं होतं.
-
रंगपंचमीचा सण म्हणजे सगळे सुरवे-फुगवे विसरून एकत्र येण्याचा हा उत्सव असतो.
-
रंगपंचमीचं हे शूटिंग या कलाकारांनी जितकं एन्जॉय केलंय. तितकचं मनोरंजन हा एपिसोड पाहताना प्रेक्षकांचं होणार आहे.
-
'राजा रानीची गं जोडी' या मालिकेत रंगपंचमीचा हा विशेष भाग येत्या सोमवारी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
VIDEO: बापरे भयंकर अपघात! वाशीमध्ये भर रस्त्यात ट्रकचा टायर फुटला अन् होत्याचं नव्हतं झालं; रिक्षाची अवस्था बघून घाम फुटेल