-
अप्रतिम सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने कायमच चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. माधुरीच्या मनमोहक सैदर्यांने अनेकांना भुरळ घातली आहे.
-
माधुरीने नुकतेच काही मनमोहक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्य़े माधुरीचं आरस्पानी सौदर्य चाहत्यांना वेड लावतंय.
-
माधुरीने यात लाईट ग्रीन कलरचा लेहंगा परिधान केला आहे. या संपूर्ण लेहंग्यावर फुलांची एम्ब्रोडरी पाहायला मिळतेय.(photo-instagram@madhuridixitnene)
-
तर संपूर्ण एम्ब्रोडरीने भरलेलं ब्लाऊज आणि त्यावर गळ्यात हिरव्या डायमंडचा नेकलेस यामुळे माधुरीचं सौंदर्य खुलून आलंय.(photo-instagram@stylebyami)
-
लाईट ग्रीन लेहंग्यावर साजेसा लाईट मेकअप करूनही माधुरीचं रुपं उजळलेलं दिसतंय.(photo-instagram@stylebyami)
-
मधुरी सोशल मीडियार चांगलीच सक्रिय असून ती कायम ग्लॅमरस लूक मधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश