-
बिग बॉसच्या सातव्या पर्वाची स्पर्धक असलेली अभिनेत्री आणि मॉडल सोफिया हयात तिच्या बोल्ड फोटोशूटसोबतच अनेक कारणांमुळे चर्चेत असते.
-
नुकताच सोफियाने होळी पार्टीत तिच्यासोबत घडलेला एक अनुभव शेअर केला आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे.
-
सोफियाने स्पॉटबायला दिलेल्या एका मुलाखतीत होळी पार्टीत तिची छेडछाड करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
-
सोफियाने सांगितलं, एकदा ती होळी पार्टी एन्जॉय करत होती. या पार्टीत सेलिब्रिटींसह काही इतर लोकही सहभागी झाले होते.यावेळी कुणीतरी तिच्या स्कर्टमध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठा धक्का बसल्याचं ती म्हणाली.
-
सोफियाने तिचा अनुभव सांगितला आहे. ती म्हणाली, “या पार्टीत पाणीपुरी होती. ही पाणीपुरी खाल्ल्यानंतर मला थोडं गरगरत होतं. कदाचित त्यात भांग किंवा इतर नशा येणारे पदार्थ मिसळलेले असावेत.
-
यानंतर तिने सांगितलं, “या पार्टीत अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढत होते. यावेळी कुणी तरी माझा स्कर्ट बाजूला सारत असल्याचं माझ्या लक्षात आलं. आधी मला भास होत आहे असं वाटलं. मात्र पुन्हा कुणीतरी माझ्या स्कर्टमध्ये हात घातल्याचं माझ्या लक्षात आलं. मी त्या व्यक्तीला बाजूला ढकलंल.”
-
या प्रसंगात सोफियाला एका व्यक्तीने मदत केल्याचं तिने सांगितलं. या व्यक्तीने तिला गाडीपर्यंत सोडलं. त्यानंतर ती घरी निघून गेली. नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये तिने एका पत्रकाराने तिला त्या दिवशी मदत केल्याचं म्हंटलं आहे. सर्व पुरुष या मदत करणाऱ्या पत्रकारासारखे असावे असं तिने या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.
-
मात्र या घटनेनंतर तिला मोठा धक्का बसला असल्याचं सोफियाने सांगितलं.
-
सोफियाने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने मुंबईत केलेल्या एका फोटोशूटचे जुने फोटो पुन्हा शेअर केले आहेत.
-
. या फोटोमध्ये ती बिकनी घालून रंगपंचमी खेळताना दिसतेय.
-
बोल्ड फोटोशिवाय सोफिया अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. बिग बॉसच्या सातव्या पर्वानंतरही तिने अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती. (all photos- instagram@sofiahaya)

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…