-
होळीचा सण आणि रंगाची उधळण म्हंटल कि गाणी आलीच.यात बिग बी अमिताभ बच्चन याचं रंग बरसे गाणं आजही रंगोत्सवात खरे रंग भरतं. बिग बींनी एक खूप जुना फोटो शेअर करत चाहत्यांना हॅप्पी होली म्हंटलं आहे.
-
तर खिलाडी अक्षय कुमालने लाडक्या लेकीसोबतच्या एका रंगपंचमीचा फोटो शेअर केला आहे.
-
तर करण जोहरने त्याच्या दोन चिमुकल्या मुलांसोबत होळीचा फोटो शेअर केला आहे. यात त्याने "ऑरगेनिक, सुरक्षित आणि उत्सव साजरा करण्यासाठी योग्य..होळीच्या सर्वांना शुभेच्छा, सणाच्या रंगात काळी छाया कायमची दूर होवो." अशा आशयाचं कॅप्शन त्याने या फोटोला दिलंय.
-
करणने त्याचा मुलगा यश आणि मुलगी रुहीचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
माधुरी दीक्षितने पतीसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जुना होळीचा फोटो शेअर करत हा सण साजरा करुयात. असं म्हणत तिने तिचा आठवणीतील होळीचा फोटो शेअर केला आहे.
-
अनन्या पांडेने एक खास फोटो शेअर केला आहे. बालपणातील होळीचा फोटो शेअर करत तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
-
अभिनेता अर्जुन रामपालने पत्नी आणि मुलासोबतच फोटो शेअर करत चाहत्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. "आप सब को होली की शुभकामनाएँ" असं कॅप्शन देत त्याने घरी रहा आणि सुरक्षित रहा असं आवाहन चाहत्यांना केलंय.
-
तर अभिनेत्री काजल अग्रवालची लग्नानंतरची ही पहिली होळी आहे. पतीसोबत एक सुंदर फोटो शेअर करत तिने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
अभिनेता मिलंद सोमणला काही दिवसांपूर्वीच करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मिलिंद होम क्वॉरंटीन आहे. अशातही त्याने चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
शिल्पा शेट्टीने कुटुंबासोबत घरातच रंगपंचमी साजरी केली आहे.
-
करीना कपूरने लाडक्या तैमूरचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर करत त्याच्यावतीने चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.
-
मलायका अरोराने काहिशा हटके अंदाजात होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मलायकाने रंगीत ड्रेसमधील एक फोटो शेअर केला आहे. 12

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”