-
अभिनेत्री निया शर्मा ही कायम वेगवेगळ्य़ा कारणांमुळे चर्चेत असतो. कधी बोल्ड फोटोशूट तर कधी बेधडक वक्तव्य. निया आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते म्हणजे तिच्या नव्या फोटोशूटमुळे.
-
नियाने नुकतच एक फोटोशूट केलं आहे. हे फोटो तिने इंन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
या फोटोत नियाने एक आकाशी रंगाचा फ्रिल ड्रेस परिधान केला आहे.
-
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने म्हंटलंय " जणू मासा पाण्याबाहेर आला आहे."
-
फ्रिलच्या या आकाशी रंगाच्या ड्रेसमध्ये निया सुंदर दिसतेय. मात्र तरीदेखील तिला ट्रोल व्हावं लागलं आहे. नुकतेच सारा अली खानने आकाशी रंगाच्या ड्रेसमधील फोटो सोशल मीड्यावर शेअर केले होते.
-
फिल्म फेअरसाठी साराने घातलेला ड्रेसही आकाशी रंगाचा फ्रिलचा होता. त्यामुळे नियाने साराला कॉपी केलं असं अनेक नेटकऱ्यांनी म्हंटलं आहे.
-
नियाने फोटो शूटसाठी परिधान केलेला ड्रेस आणि सारा अली खानने फिल्म फेअरसाठी परिधान केलेल्या ड्रेसमध्ये बरंच साम्य असल्याने नीयाने साराला कॉपी केलं का अशी चर्चा आहे.
-
यासोबतच नियाने काही गुलाबी आणि भगव्या रंगातील गाउनमधील फोटोही शेअर केले आहेत. (all photo-instagram@niasharma90)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल