-
बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर व दिग्दर्शक म्हणून रेमो डिसूझाकडे पाहिलं जातं. रेमो आज ४७ वा वाढदिवस साजरा करतं आहे. मुंबईला 'सपनो का शहर' असं म्हटलं जात. याच स्वप्नाच्या शहरात आल्यानंतर मुंबईच्या रस्त्यावर उपाशी झोपणाऱ्या रेमोकडे आज कोट्यावधींची संपत्ती आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त रेमोचा खडतर प्रवास जाणून घेऊया…
-
रेमोचा जन्म २ एप्रिल १९७२ मध्ये बंगरुळू मध्ये एका साधारण कुटुंबात झाला होता.
-
मात्र, रेमोचे शिक्षण हे गुजरातच्या जामनगरमध्ये झाले आहे. त्याचे खरे नाव रमेश यादव आहे.
-
लहाण असल्यापासून रेमोला डान्सची आवड होती. पण त्याने कधी डान्सची शिकवण घेतली नव्हती.
-
रेमो मायकल जॅक्सनला त्याचा डान्स गुरू मानतो. रेमो त्याचे व्हिडीओपाहून डान्स शिकला.
-
मुंबईत आल्यानंतर त्याच्या संघर्षामध्ये आणखी भर पडली. रेमोने डान्सची एक स्पर्धा जिंकली ज्यानंतर त्याला अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या 'रंगीला' या चित्रपटात डान्स करायची संधी मिळाली.
-
या चित्रपटानंतर रेमो अहमद खान यांना असिस्ट करू लागला.
-
एका वर्षानंतर त्याने सोनू निगमचा अल्बम 'दीवाना' कोरिओग्राफ केला, आणि तो अल्बम सुपरहिट ठरला. त्यानंतर रेमोने मागे वळून पाहिले नाही.
-
'कांटे' या चित्रपटातील 'इश्क समंदर' या गाण्यामुळे रेमोला अनेक लोक ओळखू लागले. त्यानंतर रेमोला कोरिओग्राफिच्या अनेक ऑफर्स येऊ लागल्या.
-
२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एबीसीडी' चित्रपटाचे चित्रीकरण रेमोने केले. या चित्रपटातून रेमोला दिग्दर्शक म्हणून प्रसिद्धी मिळाली.
-
'एबीसीडी' हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर २०१५मध्ये रेमोचा 'एबीसीडी २' हा चित्रपट आला. या चित्रपटात अभिनेता वरूण धवन, प्रभू देवा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्सऑफिसमध्ये चांगली कमाई केली.
-
रेमो छोट्या पडद्यावरील 'डान्स इंडिया डान्स', 'झलक दिखलाजा' आणि 'डान्स प्लस' या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून दिसतो.
-
असा खडतर प्रवास करणारा रेमो आज लग्जरीअस लाइफ जगत आहे.
-
रेमोकडे कोट्यावधींची संपत्ती आहे.
-
रेमोकडे ८ मिलियन डॉलरची संपत्ती म्हणजेच ५९ कोटी रुपयांची एकूण संपत्ती असल्याचे म्हटले जाते. (All photo credit : remo d'souza instagram)

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…