-
बॉलिवूडमधील पावर कपल म्हणून बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या जोडीकडे पाहिलं जात. आज गौरीचा ५१वा वाढदिवस आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्ताने या दोघांमध्ये श्रीमंत कोण आहे ते जाणून घेऊया.
-
गौरीचा जन्म ८ ऑक्टोबर १९७० साली दिल्लीतील पंजाबी कुटुंबात झाला.
-
गौरीने तिचे शिक्षण लॉरेटो कॉन्व्हेंट शाळेत पूर्ण केले आणि नंतर तिने दिल्लीतच फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला.
-
शाहरुख आणि गौरीने ८ वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर, १९९१ मध्ये लग्न केले. ते दोघेही ग्लॅमर आणि लग्झरीयस आयुष्य जगतात.
-
शाहरूख हा बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
-
तर दुसरीकडे त्याची पत्नी ही देशातली नावाजलेल्या इंटेरिअर डिझायनर्स पैकी एक आहे.
-
गौरीने मुकेश अंबानी, रॉबर्टो कावल्ली आणि राल्फ लॉरेन सारख्या अनेक दिग्गजांच्या घराचे किंवा ऑफिसचे इंटेरिअर केले आहे
-
गौरीचे स्वत:चे रेड चिलीज एन्टरटेनमेंट हे प्रोडक्शन हाऊस आहे. २०१८ मध्ये गौरीचं नाव फॉरच्युन मॅगझिनच्या ५० मोस्ट पावरफुल वुमनच्या यादीत नाव होत.
-
गौरीने रेड चीली या तिच्या प्रोडक्शन हाऊसमधून ‘मैं हूं ना’, ‘ओम शांति ओम’, ‘माय नेम इज खान’, ‘हैप्पी न्यू ईयर’, ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटाचे प्रोडक्शन केले आहे.
-
कोईमोईने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरूखची एकुण संपत्ती ही ५१०० कोटी आहे, तर गौरीची एकुण संपत्ती १६०० कोटी आहे.
-
शाहरूखचे मुंबईत असलेले घर मन्नत हे २६, ३२८ स्क्वेअर फिटचे आहे. दुबईत देखील त्याचा एक व्हिला आहे.
-
एवढंच नव्हे तर शाहरूखकडे लंडनमध्ये देखील एक घर आहे. त्या घराची किंमत ही १७२ कोटी आहे.
-
तर आयपीएल मधील कोलकाता नाईट रायडर्स ही टीम शाहरूख आणि जूही चावलाची आहे.
-
गौरी गेल्या काही दिवसांपासून आर्यन खानमुळे चर्चेत आहे. आर्यनला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
-
एनसीबीच्या ताब्यात असलेल्या आर्यनला नीट जेवायला मिळत नसेल हा विचार करत गौरी त्याच्यासाठी McD चे बर्गर घेऊन गेली होती. मात्र, सुरक्षेचे कारण सांगता अधिकाऱ्यांनी गौरीला याची परवानगी दिली नाही. (All photo credit : shahrukh khan instagram and gauri khan instagram)

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण